सोमेश्वरनगर - वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे काही दिवसांपूर्वीच पोस्को व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये अजून दोन आरोपींचा समावेश झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारा मध्ये अजून दोन आरोपींचा समावेश असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे ...तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ती एकटी रस्त्याने चालत जात असताना तिला जबरदस्तीने आरोपी सुजित जाधव राहणार रामनगर (ता बारामती) यांने त्यांच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये ओढून स्कॉर्पिओ गाडीच्या काळ्या रंगाच्या काचा वर घेऊन तिच्यावर अत्याचार केला व त्यानंतर मी पोलीस आहे अशी खोटी बतावणी करून पोलीस असल्याचा खोटे आयडेंटी कार्ड तिला दाखवून तू जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर मी तुझ्या घरातील आई-वडिलांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली आहे.
आरोपी सुजित जाधव सध्या फरार झाला असून त्याचा भाऊ अजित जाधव देखील एक वर्ष पासून सुमारे १६ ते १७ गुन्ह्यामध्ये फरार आहे . आरोपीचा शोध पोलीस घेत असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे . आरोपी यांने त्याच्या काळ्या रंगाची स्कॉर्पिओ मधून सोमेश्वर परिसरातील महाविद्यालय परिसरामध्ये मुलींची छेडछाड केल्याची व त्याचा पाठलाग करुन त्रास देत असल्याची व आरोपी सुजित जाधव हा आपल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी मधून रात्रभर बाहेर फिरुन गोरक्षक या नावाखाली हप्ते देखील घेतो अशी चर्चा देखील सोमेश्वर परिसरामध्ये दबक्या आवाजात चालू आहे. सुजित जाधव व गणेश गायकवाड यांच्या वर पोस्को सह ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुजित जाधव व त्याचा भाऊ अजित जाधव यांच्या घराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे पिडीता व त्याची कुटुंबीय घाबरून आहे परंतु पोलिसांनी पीडिता व पिडीतेच
या कुटुंबीयांना आम्ही तुम्हाला पूर्णपणे संरक्षण देऊ व कायद्यातील तरतुदीनुसार तुम्हाला न्याय मिळवून देऊ, तुम्ही आरोपी यांना घाबरण्याचे कारण नाही असे आश्वासन वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंतर्गत करंजेपूल दूरक्षेत्रचे पोलीस अधिकारी यांनी दिले आहे.