Crime News अश्लील व्हिडिओ बनवून विनयभंग ... सोमेश्वरनगर परिसरातील घटना
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर मोठे शैक्षणिक संकुलन आहे. येथे विविध जिल्ह्यातून शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात... एका महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थीनीशी मैत्री करीत नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात घडला आहे. याप्रकरणी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना दि. १६ जानेवारी ते २९ जून २०२५ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी पार्थ शिंदे (रा. किल्लज, ता. तुळजापूर), रोहन चाबुकस्वार (रा. करंजेपुल, ता. बारामती), सूरज दत्तात्रय भोसले, हनुमंत शिंदे, विजय मोजगे, तुषार जगदाळे अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी विद्यार्थीनीच्या मैत्रिणीने आरोपी पार्थ शिंदे याच्याशी डिसेंबर २०२४ मध्ये ओळख करून दिली होती. पार्थ हा संबंधित विद्यार्थीनीला सातत्याने फोन करून बोलू लागला.
त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली. दरम्यान, दि. १३ जानेवारी रोजी पार्थ शिंदे याने नीरा येथील 'हॅशटॅग कॅफे' येथे तिला भेटून तिच्यासोबत फोटो काढले. दि. १६ जानेवारी रोजी पीडिता महाविद्यालयात असताना पार्थने माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे असे सांगत शरीरसुखाची मागणी केली. पीडितेने नकार दिल्यानंतर त्याने तिचा सतत पाठलाग केला. याचदरम्यान, करंजेपूल येथील 'द कॉफी कॅफे' येथे भेटल्यानंतर नकळत तिचा व्हिडिओ काढत विनयभंग केला आहे .पार्थने पीडितेला WhatsApp व कॉल करून तिचे कपडे काढण्यास भाग पाडत तिचा नग्न व्हिडिओ तयार केला. तू माझ्याशी संबंध ठेवले नाहीत, तर मी हे व्हिडिओ मी तुझ्या कुटुंबीयांना पाठवेन, असे म्हणत तिला धमकावल्याचे फिर्यादित आहे.