वृक्षारोपण करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.
सोमेश्वरनगर- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामती तालुक्यातील करंजे येथे वृक्षारोपण करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संपन्न झाली जिल्हासह संपूर्ण राज्यात ही जयंती साजरी होत असते .
सामाजिक बांधिलकी जपत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत एक सामाजिक उपक्रम म्हणून ग्रामपंचायत कार्यालयमध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन तसेच परिसरात चिंच ,चाफा,दुरंडा वृक्ष लावत जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सरपंच भाऊसो हुंबरे, उपसरपंच खुर्शीदा मुलाणी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संताजी गायकवाड, माऊली केंजळे, केशव गायकवाड ग्रामसेवक काळभोर, संजय हुंबरे,सोनू पाटोळे, राहुल हुंबरे, ऍंथोनी मुलाणी ,संग्राम हुंबरे ,प्रताप गायकवाड ,शंकर सावंत, अमोल गायकवाड ,सुखदेव शिंदे,आदी ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.
आयोजन व आभार तंटामुक्ती ग्राम समिती करंजे देऊळवाडी तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष मातंग नवनिर्माण सेना अध्यक्ष सचिन पाटोळे यांनी मानले.