बारामती तालुक्यातील चोपडजपूल ते मोरगाव रस्ता आहे तर सस्तेवाडी दोन किलोमीटरचा टप्पा मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे येते येणाऱ्या विद्यार्थी नागरिकांना धोक्याचा प्रवास झाला आहे एम एस ई बी लाईट बोर्ड शेजारी वळण असल्याने व तेथे मोठे खड्डे असल्याने काही दिवसांपूर्वी तीन-चार वाहने खड्डे चुकवत असतानाच पडलेली आहे असे स्थानिक नागरिकांनी माहिती बोलताना दिली. याच रस्त्याचा वापर वाकी चोपडज, कानारवाडी,पळशी, सस्तेवाडी या ठिकाणावरील विद्यार्थी आनंद विद्यालय येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात तसेच सध्या श्रावण महिना चालू असल्याने याच मार्गाचा वापर श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिराकडे जाताना होतो. याच रस्त्याचा वापर भाविक भक्तांना करत असताना खड्ड्यामुळे रस्त्याचा नाहक त्रास होतो लवकरात लवकर संबंधित प्रशासनाने रस्त्याची दुरवस्था पाहता दुरुस्ती करावी असे स्थानिक नागरिकांनी बोलताना सांगितले.
चोपडजपूल ते सस्तेवाडी फाटा रस्ता खड्डेमय
August 04, 2025
0
चोपडजपूल ते सस्तेवाडी फाटा रस्ता खड्डेमय
Tags