भारतीय पत्रकार संघाचा पदग्रहण सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
बारामती - जनतेचे प्रश्न त्यांच्या समस्या आणि त्यांच्या गरजा ओळखून पत्रकारांनी वार्तांकन केले पाहिजे कारण सध्याच्या बदलत्या युगात लोकाभिमुख पत्रकारिता अत्यंत गरजेची असल्याचे मत भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांनी व्यक्त केले.
बारामती येथे भारतीय पत्रकार संघाचा पदग्रहण सन्मान सोहळा विक्रम सेन यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष एम.एस.शेख ,प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ ,संघटक अनिल सोनवणे ,पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष रमेश गणगे ,पुणे जिल्हाध्यक्ष तैनुर शेख ,महिला विंगच्या आरती बाबर, पुणे शहराध्यक्ष पूनम एकडे, जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे बारामतीचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे शहराध्यक्ष उमेश दुबे ,दौंडचे सुभाष कदम, शिरूरचे बाळासाहेब कांबळे ,सातारा जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव ,कार्याध्यक्ष राजाभाऊ बोंद्रे ,सोलापूरचे आर.एल.नदाफ, लीगल विंगचे कैलास पठारे, संदीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सेन पुढे म्हणाले अलीकडच्या काळात अनेक जण वृत्तपत्रांच्या किंवा विविध पत्रकार संघाच्या नावाखाली इतर उद्योग करताना आढळून येत आहेत त्या गोष्टींपासून सर्वांनी दूर राहिल्यास पत्रकार हा खऱ्या अर्थाने समाजाचा मूकनायक होईल आणि भारतीय पत्रकार संघ त्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
तर पद ग्रहण सोहळ्यास सदिच्छा भेट देताना पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी भारतीय पत्रकार संघ हा लोकाभिमुख पत्रकारितेसह सामाजिक तसेच शिक्षण व आरोग्य क्षेत्रातही अग्रगण्य असणारा पत्रकार संघ असल्याचे स्पष्ट केले.
याप्रसंगी फलटणचे जेष्ठ पत्रकार सुहास इतराज ,अमोल पवार ,विजय गाडे ,सागर चव्हाण तसेच रमेश चलवादी, संतोष कांबळे ,नाना फुंडे ,पद्माकर एडके यांसह बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
आलेल्या प्रमुख पाहुणे यांचे स्वागत मनोगतात व्यक्त करत संघाविषयी इथंबूत माहिती संघाचे जिल्हा प्रवक्ते प्रा. दिनेश पवार यांनी केले.