Type Here to Get Search Results !

मावडी सुपे मध्ये बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना

मावडी सुपे मध्ये बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना 
मुख्य संपादक विनोद गोलांडे 
सासवड(प्रतिनिधी)पुरंदर तालुक्यातील मावडी सुपे येथे बौद्धधम्माचा पवित्र संदेश देणारा ऐतिहासिक कार्यक्रम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाकरुन साजरा करण्यात आला. बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना पनवेल येथील प्रसिद्ध उद्योगपती किशोर जी कामत यांच्या हस्ते करण्यात आली.भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील आयु. भंते दीपंकार थेरो यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात आला.बौद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या अनुषंगाने मावळे गावांमध्ये दिवसभर अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण व धम्म वंदना घेण्यात आली.बारा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण गावामध्ये सवाद्य मंगलमय वातावरणामध्ये बुद्धम् ् शरणम ् गच्छामि या गजरामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे मिरवणूक काढण्यात आली. वरून राजाने देखील मेघ वृष्टीने भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीवर पुष्प वृष्टीचा वर्षाव केला. सवाद्य मिरवणुकीनंतर भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची विधिवत बौद्ध धम्माच्या नियमानुसार प्रतिष्ठापना करण्यात आली.तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती कुशल शिंदे यांच्या हस्ते बसविण्यात आली. बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.बौद्ध धर्माच्या पवित्र वर्षावासातील पवित्र महिना असल्यामुळे बौद्धचार्य वाघमारे यांनी धम्म देसना व धम्म प्रवचन वामन वाघमारे यांनी केले.बौद्ध धार्मिक विधी पुरंदर तालुका भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य दादासाहेब गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्रिशरण, पंचशील, बुद्ध पूजा, भीम स्तुती, सरनेत्य इत्यादी विधी पार पाडला. यावेळी उद्योगपती किशोर जी कामत,बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार,प्रसिद्ध निवेदक जितेंद्र देवकर,अशोक गायकवाड, सर,बौद्धचार्य योगेश,बौद्धचार्य बापू सोनवणे,बौद्धचार्य मल्हार सोनवणे, धम्म भगिनी शालन ताई सोनवणे,धम्म भगिनी निलंगी भोसले,धम्म भगिनी संतोली सोनवणे ,बौद्धचार्य मल्हार वानखेडे,नथुराम साखरे,सरपंच अनिल देवकर यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये विविध गावचे बौद्ध उपासक आणि उपासिका उपस्थित होते.त्यामध्ये उत्तम देवकर,किरण देवकर,किसन आप्पा देवकर,माजी कृषी अधिकारी सुनील जगताप,पुरंदर तालुका आर. पी.आय.अध्यक्ष बळीराम सोनवणे,श्रमिक ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष कालिदास उबाळे,सामाजिक कार्यकर्ते सुहास बेंगळे,संजय कांबळे,बाळ कांबळे,प्रकाश कांबळे,मुरलीधर कांबळे,अक्षय रोकडे,प्रवीण वाघमारे, दत्तात्रय वाघमारे,प्रकाश जमदाडे,आप्पा वाघमारे,मिलिंद गायकवाड,दिनेश गायकवाड,दिनकर देवकर,दिलीप देवकर,विजय बापू देवकर,प्रकाश कांबळे,कुशल शिंदे,सोनवणे गुरुजी यासह संयोजक बौद्धजन विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test