सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील अठरापगड जाती धर्माचे असलेल्या करंजगाव आहे या गावातील सरपंच व ग्रामस्थ मागील दोन वर्षापासून करंजे गावातील शैक्षणिक आरोग्य सोयीसुविधा संदर्भात सोमेश्वर विद्यालय भाग शाळा करंजे व प्राथमिक आरोग्य केंद्र करंजे या ठिकाणी वेळोवेळी भेट देत असतो.
मागील आठवड्यात भाग शाळेतील शिक्षकांच्या आपापसातील वादामुळे विद्यार्थी यांच्या वर परिणाम झाला. शिक्षकांच्या सांगण्यावरून विद्यार्थिनी मला फोन आल्यामुळे मी प्रथम नागरिक सरपंच व ग्रामस्थांनासह शाळेत गेलो असता शिक्षकांमधील वाद मिटवला व विद्यार्थिना घरी पाठवले त्यांनतर मुख्याध्यापक तिथे आले असता त्यांनी ग्रामस्थांसह मिटिंग घेण्याचे ठरवले.
चार दिवसांपूर्वी इंजिनियरिंग कॉलेज सोमेश्वर येथे मिटिंग हॉलमध्ये सरपंच व उपसरपंच यांना फक्त बोलावले त्यावेळी मी गेलो असता त्याठिकाणी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भरत खोमणे, सो.सह.सा. कारखान्याचे संचालक तसेच संग्राम सोरटे व ऋषिकेश गायकवाड तसेच मुख्याध्यापक पी.बी. जगताप, माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक .आनंदराव होळकर उपस्थीत होते.
त्यावेळेस विद्यमान संचालक आनंदराव होळकर यांनी उपस्थीत असताना मिटिंगमध्ये करंजे गावाबद्दल मानहानीकारक अपशब्द वापरून करंजे ग्रामस्थांचा हेतू पुरुस्कर अपमान केला.
करंजे गावाचा व हायस्कूलचा काही संबंध नाही. करंजे गावाला काय सोने लागले आहे का? अशी अनेक विधाने केली.
यानंतर गावामध्ये मी आल्यानंतर ग्रामस्थांना सर्व माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी १५ ऑगस्टच्या शाळेच्या कार्यक्रमास न जाण्याचा निर्णय घेतला आहे.