सोमेश्वरनगर - देश ७९वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना सोमेश्वर विद्यालयातील गोरगरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना एस. एस. सी. बॅच १९९० दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून ५३ गणवेश वाटप करण्यात आले.
याप्रसंगी माजी केंद्रप्रमुख सुनिल घाडगे, दादा गायकवाड, राजेंद्र जगताप, तात्यासाहेब गायकवाड, शुभांगी खलाटे, वर्षा शिंदे, मृणाली अलगुडे, संगीता हुमे हे माजी विद्यार्थी तसेच प्राचार्य पी. बी. जगताप, उपप्राचार्य एन. टी. लोणकर पर्यवेक्षक एस. ई. जगदाळे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रयत्न, चिकाटी, प्रामाणिकपणा असे गुण आत्मसाद करा यश तुमचेच आहे असे मत मान्यवरांच्या वतीने बोलताना मृणालिनी अलगुडे यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक वाय. एस. महाले यांनी केले तर सूत्रसंचालन झुरंगे आर. व्ही. यांनी केले. आभार डी. पी. कर्डेल यांनी मानले.