"विशेष गुणवंत विद्यार्थी" गुणगौरव व कौटुंबिक "स्नेह मेळावा" मोठ्या उत्साहात संपन्न.
मुख्य संपादक विनोद गोलांडे...
पुणे प्रतिनिधी- समाज स्थापनेच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षी व देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनी कोकणस्थ कुंभार समाज विकास संस्था पुणे जिल्हा समाजाच्या वतीने शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी समाजबांधव व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला "विशेष गुणवंत विद्यार्थी" गुणगौरव व कौटुंबिक स्नेह मेळावा आयोजन कोकणस्थ कुंभार समाज विकास संस्था पुणे यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी समाजाचा महासोहळा ऑफलाईन व ऑनलाईन फेसबुक च्या माध्यमातून केलेहोते. संस्थेचे अध्यक्ष कोकणरत्न चंद्रकांतजी चिवेलकर ( साळवी) यांच्या प्रेरणेने समस्त समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते
श्रीमती सरिता अनंत साळवी यांनी भुषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगरसेवक प्रकाशजी कदम , सुनीलजी साळवी , सतीशदादा दरेकर ( संस्थापक अध्यक्ष कुंभार समाज सामाजिक संघटना ), प्रकाशजी साळवी ( कोकण विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र कुंभार समाज), बाबाजी कुंभार ( अध्यक्ष पुणे जिल्हा कुंभार समाजन्नोती मंडळ, पुणे ), संतोष कुंभार ( अध्यक्ष पायी पालखी सोहळा , पुणे ), रामचंद्र हडशिकर ( सचिव कुंभार समाजउन्नती मंडळ पुणे ) दत्ताजी बावधनकर (कोशाध्यक्ष कुंभार समाजउन्नती मंडळ पुणे ), प्रदीपजी शिरकर ( उपाध्यक्ष कोकण विभाग महाराष्ट्र कुंभार समाज संघटना) , चिपळूण तालूका पदाधिकारी भालेकर सर ( उपाध्यक्ष महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संघटना), माहेशजी पडवेकर (युवाअध्यक्ष रत्नागिरी जिल्हा ), तुकारामजी जाधव ( अध्यक्ष कोकणवासीय महासंघ पुणे) , व नाशिक येथील आदरणीय थोर सामाजिक कार्यकर्ते सुभाषजी जाधव साहेब यानी भुषविले तर विषेश उपस्थिती कोकणस्थ कुंभार समाज पिंपरी-चिचवड समाजाचे समस्त यूवा सन्माननीय कार्यकारणी यांनी दर्शविली दुपारी ४.०० वाजता सूरू झालेला हा सोहळा सायंकाळी ९.०० वाजेपर्यंत धुमधड्याकात साजरा झाला.
या मध्ये अनेक मनोरंजन पर कार्यक्रम सादर झाले इयत्ता १० वी मधे ८३.०० % गुण मिळविलेल्या कु. स्वरदा स्वप्नील साळवी तसेच ८२.२०% गुण स्वरीत स्वप्नील साळवी , इयत्ता १२ वी मधे ८१.८३ % गुण मिळविलेल्या कु. आर्या गणेश बिरवाडकर व खेळामधे व ईतर परीक्षान मध्ये विषेष प्राविण्य मिळविलेल्या कु. आर्या गणेश बिरवाडकर, कु. आर्या प्रशांत निवळकर, कु. ओंकार अशोक साळवी , कु चैत्रगौरी विशाल साळवी, कु. प्रगती संतोष साळवी , कु. श्रवण संदीप साळवी, कु. आज्ञा संदीप साळवी यांचे विषेश गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान करून त्यांचे कौतुक केले
समाजासाठी मनापासून झटणाऱ्या व आपल्यातील कलागुणांची जनमाणसात विशेष छाप सोडणाऱ्या मान्यवरांना सन्मानित केलेगेले व गौरवविण्यात आले समस्त समाज बांधवांचे व निमंत्रितांचे स्वागत व प्रस्तावना सादरीकरण समाजाचे संघटक समाजरत्न संतोष साळवी (चिवेलकर) यांनी केले तर सूत्रसंचालनाची जबाबदारी सौ. जोस्तनाताई सागर साळवी , कु. प्रगती साळवी, कु. स्वरदा साळवी , कु. आदित्य साळवी, कु. दिव्यांश कळमकर यांनी पार पाडली कार्यक्रमाची सुरूवात ऑनलाइन स्वरूपात श्री अमोलजी निवळकर यांच्या अप्रतिम निवेदनानेझाली कार्यक्रमा मध्ये देशभक्तीपर गीत, नृत्य, भक्तीगीत, समुहगीत, चित्रपटगीत अशा विविधांगी मेजवानीने रंगतदार झाला
या सोहोळ्याचा आस्वाद अखिल कुंभार बांधवांना घेता यावा यासाठी फेसबुक च्या माध्यमातून ' LIVE ' सदारीकरण पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती यासाठी समाजाचे आदरणीय खजिनदार राजेंद्रजी पडवेकर , उपाध्यक्ष समाजरत्न गजाननदादा बागवडे , अशोकजी शिरकर व , सूर्यकांतजी चिवेलकर ( साळवी ), तुकारामजी शिरकर, संतोषभाऊ कळमकर, कु. धनंजय बागावडे, छाया साळवी , संदीप मटकर (साळवी), सागर विन्हेरकर , साईचंद्र करंजेकर, श्री मदन व्हालकर , अजय वाडकर यांनी विशेष मेहनत घेतली. यांच्या मुळेच सर्वांना घर बसल्या सोहोळ्याचा मनमोकळा आनंद अनुभवता आला
सोहोळ्याच्या माध्यमातून पुणे शहरातील कुंभार समाजाच्या कोहिनुर हिऱ्यांचा प्रकाश संपूर्ण
महाराष्ट्रातील कुंभार बांधवांच्या घरा घरात पोहोचला आहे. आणि हा सोहोळा प्रकाशमान सोहोळा ' झाला आणि सर्वांच्या मनातला अंधकार दूर करून सर्वांच्याच जीवनाला सकारात्मक ऊर्जा व दीशा देणारा ठरला.
संघटक - कोकणरत्न संतोष चंद्रकांत साळवी चिवेलकर