सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील प्रसिद्ध सोरटी सोमनाथाचे प्रति रूप मानले जाणारे करंजे येथील स्वयंभू सोमेश्वर शिवलिंग आहे . बारामती शहर पासून 30 किलोमीटर ,पुणे शहरापासून 80 किलोमीटर तर सातारा पासून 60 किलोमीटर अंतरावर असणारे हे श्री क्षेत्र स्वयंभू शिवलिंग सोमेश्वर मंदिर आहे . श्रावण मास यात्रा निमित्त सोमेश्वर मंदिर येथे विविध जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून शिवभक्त भाविक दर्शनासाठी येत असतात नुकतीच श्रावण महिना यात्रा सोमवार दि १८ ऑगस्ट रोजी मोठ्या भक्तीमय वातावरण संपन्न झाली. यात्रेनिमित्त विशेष सहकार्य असणाऱ्या पंचक्रोशीतील आजी-माजी पदाधिकारी, विविध जिल्ह्यातून आलेले शिवभक्त यांनी स्वखर्चातून अन्नदान केले तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग,महामंडळ ,महावितरण, सर्व पत्रकार बंधू अशा घटकांचे आभार देवस्थान ट्रस्ट चेअरमन अनंत मोकाशी ,सचिव विपुल भांडवलकर तसेच विश्वस्त मंडळ यांनी मानले.
"सोमेश्वर"श्रावण मास यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न तर आलेल्या सर्वच शिवभक्तांचे आभार - चेअरमन अनंत मोकाशी.
August 19, 2025
0
"सोमेश्वर"श्रावण मास यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न तर आलेल्या सर्वच शिवभक्तांचे आभार - चेअरमन अनंत मोकाशी.
Tags