पुणे : सन २०२५ या वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शाळांसाठी स्थानिक सुट्ट्यांची घोषणा विभागीय आयुक्त पुणे विभाग डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली आहे. शासन, सामान्य प्रशासन विभागाने दि. १४ मार्च १९८३ रोजी काढलेल्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून हा आदेश करण्यात आला असून, त्यानुसार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना गौरीपूजन, घटस्थापना आणि नरक चतुर्दशी या उत्सवांच्या दिवशी सुट्टी मिळणार आहे.
जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्यांमध्ये सोमवार, दि. ०१ सप्टेंबर २०२५ रोजी गौरीपूजन, सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी घटस्थापना आणि सोमवार, दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी नरक चतुर्दशीचा समावेश आहे.