Type Here to Get Search Results !

माळेगाव पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकानी दमदार कामगीरी करत बस चोरीचा गुन्हा उघड.

माळेगाव पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकानी दमदार कामगीरी करत बस चोरीचा गुन्हा उघड.

सोमेश्वरनगर - माळेगाव पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकानी दमदार कामगीरी करत बस चोरीचा गुन्हा उघड ७,००,०००/- रू किमतीचा मुददेमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस प्रशासन यांनी दिली असून माळेगाव परीसरात चोरीचे प्रमाणे वाढले असल्याकारणाने मा.पोलीस अधिक्षक सो यांनी सदर गुन्हे उघड करणेकरीता व त्यावरती प्रतिबंध करणेकरीता गुन्हे पथकाला व पोलीस स्टेशनचे प्रभारी सचिन लोखंडे सो यांना सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे साहेब यांचे सुचनेप्रमाणे गुन्हे पथकाने व पोलीस स्टेशनचे इतर अंमलदारांनी पोलीस स्टेशनचे हदिदमध्ये दरम्यान ता. २८ रोजी पहाटे ५वा चे सुमा मौजे माळेगाव राजहंस चौक येथील शनी मदीरासमोरून मुयुरेश्वर नावाचे बॅटरीचे दुकानाचे शेजारील मोकळया जागेतुन ७,००,००० /- रू कि.चा एक पांढरे रंगाचा फोर्स माटर्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर मिनीबस लावलेले ठिकाणहुन अज्ञात व्यक्तीने चोरी करून नेलेबाबत फिर्यादी सचिन बाबसो कोकरे रा. धुमाळवाडी ता.बारामती जि.पुणे असे यांनी पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार फिर्याद दिली तकार प्राप्त होताच पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी गुन्हे शोध पथकाला बोलावुन सदर चोरी उघड करणेबाबत मार्गदर्शन केले व तश्या सुचना दिल्या सदर गुन्हयातील फिर्यादी तसेच सदर ठिकाणचे सि.सी.टि. व्ही फुटेज चेक केले व तांत्रिक बाबीचा अभ्यास करता सदर टेम्पो चालकावर संशय वाढलेने चालक नामे .प्रदिप रामचंद्र शिंदे रा.क - हावागज ता. बारामती जि.पुणे यास चौकशी कामी ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने बस चोरी केलेबाबत कबुली दिली असुन सदर आरोपी कडुन चोरीस गेलेला माल १)७,००,०००/- रू कि.चा एक पांढरे रंगाचा फोर्स माटर्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर मिनीबस असा एकुण ७,००,००० /- रू किमतीचा मुददेमाला हस्तगत केला आहे. यातील फिर्यादी यांचे दिले फिर्यादी वरून माळेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं २२३/२०२५ बी.एन.एस क.३०३(२)वगैरे कलमांतर्गत गुन्हा नोंद केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार राहुल पांढरे करीत आहेत.

सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक संदिपसिंग गिल सो, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिराजदार, उपविभागिय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक देविदास साळवे, पोलीस हवालदार. राहुल पांढरे, विजय वाघमोडे, अंमलदार अमोल राउत, ज्ञानेश्वर मोरे, नितीन कांबळे, अमोल वाघमारे यांनी केली आहे. 
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test