बारामती : प्रधानमंत्री पीक विमा सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना १४ ऑगस्ट व कर्जदार शेतकऱ्यांना ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे.
यापूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 पर्यंत होती. तरी तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी www.pmfby.gov.in या पोर्टलवर स्वत: अथवा बँक विमा कंपनीने नियुक्त केलेले प्रतिनिधी, क्रॉप इन्शुरन्स ॲप व सामूहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत योजनेत सहभागाची नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी, सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.