जेजुरी - पुरंदर तालुक्यातील निरा येथे सध्या गुटखा व तत्सम पदार्थाची विक्री राजरोस पणे सुरु असल्याची माहिती आरपीआय ( ए ) चे पुणे जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल साबळे यांना समजली ही विक्री करताना वडगाव पोलीस पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफिने त्यांना पकडले अशी माहिती मिळताच अमोल साबळे यांनी एक प्रश्न केला निरेतील एका इसमाला वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत पकडले जाते व निरा पोलिसांना ही माहिती मिळत नाही याचे नवल वाटले.
त्यासाठी अमोल साबळे आरपीआय (ए ) युवा उपाध्यक्ष, अविनाश भालेराव राष्ट्रवादी ( अजितदादा ) तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, संजय क्षीरसागर सचिव आरपीआय (ए ) निरा शहर याच्यावतीने याबाबतचे निवेदन सोमवार दि.४/८/२०२५ रोजी देऊन सविस्तर चर्चा केली व आपण जातीने यात लक्ष घालण्याची विनंती केली.
या निवेदनात असाही उल्लेख केला की जर संपूर्ण गुटखा व तत्सम पदार्थ विक्री बंद असताना हा काळाबाजार थांबवावा अन्यथा आरपीआय पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल.