Type Here to Get Search Results !

बारामती येथे भारतीय पत्रकार संघातर्फे पदग्रहण सोहळ्याचे आयोजन.

बारामती येथे भारतीय पत्रकार संघातर्फे पदग्रहण सोहळ्याचे आयोजन.
बारामती प्रतिनिधी- बारामती येथील दूध उत्पादक संघाच्या सभागृहात येत्या रविवारी ( १०ऑगस्ट ) भारतीय पत्रकार संघ बारामती विभागातर्फे पदग्रहण सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष तैनूर शेख यांनी दिली.

या कार्यक्रमाचे उदघाटन राज्यसभेच्या खासदार सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन हे असणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे तसेच माजी राज्यमंत्री तथा पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे हे देखील उपस्थित राहणार आहे .

तर सन्मानिय उपस्थितीत पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम. एस. शेख ,प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ, संघटक अनिल सोनवणे ,पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष रमेश गणगे , पुणे जिल्हाध्यक्ष तैनूर शेख, महिला अध्यक्षा आरती बाबर ,पुणे शहराध्यक्ष पूनम एकडे, जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे ,लीगल विंगचे प्रदेश अध्यक्ष कैलास पठारे यांसह ए. आय. जे.सातारा जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव, कार्याध्यक्ष रवींद्र बोंद्रे ,सोलापूरचे कार्याध्यक्ष आर. एल.नदाफ, पुणे जिल्हा प्रवक्ते प्रा. दिनेश पवार शिरूरचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे ,दौंड तालुकाध्यक्ष सुभाष कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुका व शहर कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती बारामती तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे तसेच शहराध्यक्ष उमेश दुबे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test