सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी भापकर येथील सुरेश विठठलराव बारवकर रा.लोणी भापकर यांनी अभिषेक विठ्ठल पांचाळ हल्ली रा.बर्गेवस्ती आळंदी रोड चाकण ता.खेड जि.पुणे मुळ रा. नई आबादी दिगलूर रोड उदगीर ता.उदगीर जि.लातुर 2) सिद्धांत माधव गगनभिडे हल्ली रा.कोकणे चैकण ता.खेड जि.पुणे मुळ रा.पाटोदा बु ता.जळकोट जि.लातुर यांच्याविरुद्ध मे २०२ ते२९/८/२०२५ रोजी रात्री लोणी भापकर येथे गुन्हा
नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी घरी असताना इसम नामे अभिशेक विठ्ठल पांचाळ आणि सिद्धांत माधव गगनभिडे या दोघांनी फिर्यादीला त्यांनी बनविलेले नग्न व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवुन तसेच फिर्यादीचे व्हिडीओ गटशिक्षणाधिकारी यांना पाठविन व तुमची शिक्षकाची नोकरी घालविन असे म्हणुन फिर्यादीला शिवीगाळ दमदाटी करून पैसे न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देवुन व फिर्यादी कडुन वेळोवेळी १ लाख १५ हजार ३५०/- रूपये घेतले आहेत व सर्व व्हिडीओचे प्रकरण मिटवण्यासाठी अजुन एक लाख रूपये दे नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही तुझे नग्न व्हिडीओ व्हायरल करीन असे म्हणुन शिवीगाळ दमदाटी करून धमकी केली आहे म्हणुन माझी १) अभिषेक विठ्ठल पांचाळ हल्ली रा.बर्गेवस्ती आळंदी रोड चाकण ता.खेड जि.पुणे मुळ रा. नई आबादी दिगलूर रोड उदगीर ता.उदगीर जि.लातुर २) सिद्धांत माधव गगनभिडे हल्ली रा.कोकणे चैक चाकण ता.खेड जि.पुणे मुळ रा.पाटोदा बु ता.जळकोट जि.लातुर यांचेविरोधात कायदेषीर फिर्याद आहे.वगैरे मजकुरावरुन गुन्हा रजिस्टरी दाखल केला असुन गुन्हयाचा वर्दी रिपोर्ट मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्याची तजवीज ठेवलेली आहे.पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहे.



