"ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला", गणेशोत्सवाचा जल्लोष,फुलांची उधळण करत बाप्पाचं आगमन.
सोमेश्वरनगर - राज्यात घरोघरी आणि विविध मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. अनेक मंडळांनी.. ढोल-ताशांच्या नादात आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात ...तर कोण आहे फुलांची उधळण करत मोठ्या थाटात बाप्पाचे आगमन ठिकठिकाणी होत असताना दिसत आहे.
बुधवार दि २७ऑगस्ट पुढील १० दिवस गणेशोत्सव हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.अनेक शहरात, गाव खेड्यात गणेश मंडळे तसेच घरगुती गणेशोत्सवाचा आनंद सोहळा सुरू आहे. यामध्ये बारामती शहरासह ग्रामीण भाग पण अग्रेसर आहे. बारामतीतील सोमेश्वरनगर परिसरात सकाळ पासूनच करंजेपुल येथील मुख्य बाजारपेठ गणेश मूर्ती तसेच विविध सजावट साहित्यांनी फुललेली होती. घरगुती गणपती तसेच अनेक गणेश मंडळांनी वाजत गाजत गणेश मूर्ती स्थापना करण्यासाठी नेण्याची लगबग चालू होती. बाजारपेठ मध्ये एक फुटी ,दोन फुटी तसेच पाच फुटी अशा विविध आकर्षित गणेश मूर्ती बाजार पेठ मध्ये विक्रीसाठी आल्या होत्या. यामध्ये तीनशे रुपये पासून ते पाच ते सात हजार रुपये पर्यंत गणेश मूर्ती विक्री असल्याचे व्यवसायिकांनी बोलताना सांगितले.
वडागावं निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वरनगर येथील करंजेपुल दूरक्षेत्रचे पीएसआय राहुल साबळे सह पोलिस अधिकारी यांनी कार्यक्षेत्रातील गणेश मंडळ ठिकाणी जात भेट दिली कायदा व्यवस्थेचे कोणीही उल्लंघन न करता डीजे मुक्त गणेश उत्सव तसेच पारंपारिक कार्यक्रम तसेच पारंपारिक वाद्यांनी गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पीएसआय साबळे यांनी करंजे येथील श्री गणेश मित्र मंडळ येथे बोलताना सागितले.
गणेशोत्सवाचा पहिला दिवस असून करंजे येथील श्री गणेश मित्र मंडळाची गणेश मूर्ती स्थापना मोठ्या भक्तीमय वातावरणात करण्यात आली श्रींची पूजा करंजे सरपंच भाऊसो हुंबरे यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत विद्यमान सदस्या मयुरी गायकवाड व अफसाना मुलानी उपस्थित तर पुरोहित म्हणून प्रभाकर बोकील होते.
याप्रसंगी करंजे ग्रामस्थ, महिला वर्ग व मित्र मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.
___________________________________________
कायदा सु व्यवस्थेचे कोणीही उल्लंघन न करता डीजे मुक्त.. भक्तिमय वातावरणात गावागावी गणेशोत्सव साजरा करावा पारंपारिक कार्यक्रम ...समाज उपयोगी संदेश देणारे कार्यक्रम....पारंपारिक वाद्यांनी गणेशोत्सव साजरा करा
पीएसआय (PSI )राहुल साबळे.



