सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येत आहे की, आज सर्वांच्या घरी गौरी स्थापना झालेल्या असून आपण त्यासाठी घरातील सर्व सोने, पैसा, शृंगार वगैरे आपण गौरीवर परिधान करतो त्यावर काळजीपूर्वक लक्ष द्यावे. घरातील सर्वांनी सावध झोपावे. बरेच लोक सोशल मीडियावर घरातील सजावटीचे फोटो व्हिडिओ शेअर करतात त्याचाच फायदा घेऊन चोर/भामटे चोरी करण्याची शक्यता नाकारता येत. यापूर्वी असे गुन्हे घडले आहेत म्हणून सावधगिरी बाळगा आणि सतर्क रहा व सर्वांनी आपले मौल्यवान दागिने पैसे संभाळावे असे आवाहन वडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी केले आहे.
गौरी गणपती सोशल मीडियावर घरातील सजावटीचे फोटो व्हिडिओ शेअर करत असाल तर सावधानता बाळगा - API नागनाथ पाटील
September 01, 2025
0
गौरी गणपती सोशल मीडियावर घरातील सजावटीचे फोटो व्हिडिओ शेअर करत असाल तर सावधानता बाळगा - API नागनाथ पाटील
Tags