सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील मु.सा काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आविष्कार संशोधन स्पर्धेनिमित्त एक दिवशीय मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी तसेच विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प तयार व्हावेत व असे संशोधन प्रकल्प समाज हितासाठी दिशादर्शक ठरावेत या उद्देशाने आविष्कार संशोधन स्पर्धा घेतली जाते. आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये प्रकल्प कसे तयार करावेत व प्रकल्पांचे विषय कसे निवडावेत या संदर्भात टी.सी महाविद्यालय बारामतीचे उपप्राचार्य व भूगोल विभाग प्रमुख डॉ.अरुण मगर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी आविष्कार संशोधन स्पर्धेचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित करून मानवी विकासात संशोधनाचे महत्त्व याविषयी उत्तम मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सदरच्या कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे , डॉ. जया कदम, आय.क्यू. ए.सी. समन्वयक डॉ. संजू जाधव, डॉ. बाळासाहेब मरगजे, डॉ. दत्तात्रय डुबल, डॉ.राहुल खरात, प्रा. नामदेव जाधव इत्यादी प्राध्यापक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए. आर. सी. समन्वयक डॉ.श्रीकांत घाडगे यांनी केले तर प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी आभार मानले.
सोमेश्वरनगर ! मु.सा काकडे महाविद्यालयात आविष्कार संशोधन स्पर्धा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
September 03, 2025
0
सोमेश्वरनगर ! मु.सा काकडे महाविद्यालयात आविष्कार संशोधन स्पर्धा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
Tags