Type Here to Get Search Results !

करंजे गावच्या सौंदर्यात भर १४ ट्री फाउंडेशनच्या माध्यमातून पाच हजार विविध वृक्षांचे वृक्षारोपण.

करंजे गावच्या सौंदर्यात भर १४ ट्री फाउंडेशनच्या माध्यमातून पाच हजार विविध वृक्षांचे वृक्षारोपण.

सोमेश्वरनगर - तसे करंजे गावं हे आठरा पगड जाती धर्माचे लोक असणारे गावं त्यामुळे सर्वच जयंती उत्सव मोठ्या एकोप्याने साजरे होत असतात. गावं भवितव्य चांगले घडण्यासाठी सर्वजण एकजुटीने एकत्र येत असतात. करंजे गावच्या सौंदर्यात आणखीन एक भर साठी करंजे ,१४ फाउंडेशनचे व्यवस्थापक अनंत तावडे ,प्रतिनिधी बजरंग बोरकर यांच्या माध्यमातून व करंजे ग्रामपंचायत सरपंच भाऊसो हुंबरे यांच्या पुढाकाराने पिण्याच्या पाण्याच्या टाकी शेजारील गायरन क्षेत्र येथे पाच हजार चिंच, आवळा, जांभूळ, ताम्हण, अर्जुन, कांचन, कडुलिंब, कवठ, अर्जुन , बेहडा अश्या विविध जातीचे झाडांचे वृक्षारोपण बारामती तहसीलदार गणेश शिंदे यांच्या शुभ हस्ते बुधवार दि १७ रोजी करण्यात आले. 
   अध्यक्षीय भाषणात तहसीलदार शिंदे यांनी गावचे कौतुक करत  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा अश्या उपक्रमाची आवड आहे असे नमूद करत १४ ट्री फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या वृक्षारोपणास आवश्यक मदत करण्याचे आश्वासन कार्यक्रम प्रसंगी बोलताना शिंदे यांनी सरपंच भाऊसो हुंबरे यांना दिले.
वृक्षारोपण वेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे, मा तालुकाध्यक्ष संभाज होळकर, कारखाना संचालक संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, लक्ष्मण गोपने , प्रसिद्ध उद्योजक संतोष कोंढाळकर, बुवासाहेब हुंबरे, नीरा कृषी उत्पन्न समिती सदस्य बाळासाहेब शिंदे, ग्रामसेवक चंद्रशेखर काळभोर, उपसरपंच खुर्शिदा मुलानी,सदस्य अफसाना मुलानी, मयुरी गायकवाड, पिनु होळकर ,मा सरपंच प्रकाश मोकाशी , मा संताजी गायकवाड,करंजे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटोळे, माऊली केंजळे, संजय गोलांडे,प्रताप गायकवाड, अतुल गायकवाड, काका भंडलकर , करंजेपुल मा सरपंच वैभव गायकवाड ,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेंडकर, प्रसाद सोनवणे, सुखदेव शिंदे, फाउंडेशन सदस्य धीरज वायाळ होते.
 सूत्रसंचलन सरपंच भाऊसो हुंबरे मनोगत बुवासाहेब हुंबरे तर आभार राकेश गायकवाड यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test