"एक हात मदतीचा"..जैनब शेख हिच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याची गरज
बारामती : सिकल सेल सारख्या दुर्मिळ आजाराला तोंड देणाऱ्या अवघ्या बारा वर्षांच्या जैनब शरीफ शेख हिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा ओघ सुरू असुन उपचारासाठी २५ लाख रुपये मदत गोळा करण्याचे अशक्यप्राय आव्हान शेख कुटुंबाला पेलावे लागणार आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या शरिफ शेख यांच्या बारा वर्षांच्या जैनब हिला सिकल सेल हा दुर्मिळ आजार झाला आहे.तिच्यावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हि शस्त्रक्रिया ज्युपीटर हॉस्पिटल बाणेर पुणे येथे करावयाची असुन या शस्त्रक्रियेसाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च येणार आहे.शरिफ शेख यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे लोकांकडून मदतीची अपेक्षा केली आहे.
दरम्यान शरिफ शेख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नवजीवन उद्योग समूहाचे प्रमुख शितल आप्पा लोखंडे यांनी ५० हजार रुपये, संचालक संतोष जाधव यांनी १५ हजार रुपये, श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कूल १९८३ च्या दहावी बॅच व बलराम शेतकरी गट ५१ हजार रुपये, श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कूल सन२००५-०६ च्या बॅचने २७ हजार पाचशे रुपये, श्री शिवछत्रपती दहिहंडी संघ, पोलिस दलात असलेल्या बंडगर बंधुंसह अनेकांनी आपल्या परीने सर्वोतोपरी आर्थिक मदत दिली आहे.
दरम्यान जैनबच्या मदतीसाठी अरविंद देशपांडे प्रस्तुत रागाज म्युझिकल संगित रजनी नटराज नाट्यकला मंदिर बारामती येथे (दि.२०) रोजी आयोजन केले असून रसिकांनी मदत म्हणून या शो ची तिकीटे खरेदी करून छोटीशी मदत करावी.
दरम्यान खर्च जरी आवाक्याबाहेर असला तरी माझ्या मुलीचा जीव वाचविण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक मंडळे, उद्योजक, व्यावसायिक, राजकीय पदाधिकारी, नोकरदार वर्ग व सर्व सामान्य नागरिकांनी सढळ हाताने शक्य असेल तेवढी मदत करावी असे आवाहन शरिफ शेख यांनी केले आहे.