राष्ट्रवादी भवन येथे “नवदुर्गा सन्मान पत्र व नियुक्ती पत्र प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
बारामती प्रतिनिधी - बारामती येथे राष्ट्रवादी भवन येथे “नवदुर्गा सन्मान पत्र व नियुक्ती पत्र प्रदान करण्यात सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुका महिला अध्यक्षा ज्योती लडकत यांच्या हस्ते या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.
त्यामध्ये पत्रकार, लेखिका, उदयोजिका शेतकरी शेक्षणिक सामजिक क्षेत्रातील तसेच इतर अनेक महिला ज्यांनी आपल्या कर्तवाने समाजात वेगळा ठसा उमटवला आहे, त्यांचा यावेळी सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली सावंत यांनी केले या उपक्रमातून महिलांना सन्मानाची जाणीव होऊन त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास तालुका महिला अध्यक्ष सौ.ज्योती लडकत यांनी व्यत्ककेला उपस्थित मान्यवरांनीही महिल्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानांचा गौरव केला.
महिला सशत्कीकरणांचा संदेश देणार हा सोहळा उत्साहात पार पडला या वेळी उपस्थित पत्रकार क्षेत्रा त उल्लेखनीय कामगिरीबद्दल पल्लवी चांदगुडे, मेघा गोलांडे लेखिका म्हणून मंगल बोरावके, योगिता काळोखे, अर्चना सातव, घर कुटुंब सांभाळून उद्योजका असणारे उद्योजिका सन्मान गौरी सावळे पाटील शशिकला गटकळ संगिता घोलप पूजा पवार,रुपाली ननवरे यांना मिळाला तर शेतकरी कुटुंबातील सपना हगवणे,शितल सावंत तसेच शैक्षणीक क्षेत्रातील राजश्री आगम, घनवट, निलमा लडकत सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी म्हणून अंजू वाघमारे, प्रिया भोसले व इतर गोरी गाडेकर, युवती अध्यक्ष भाग्यश्री धायगुडे या सर्वांना सन्मान पत्र साडी चोळी व महिला उपयोगी साहित्य देत त्यांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला.
________________________________________
घर जबाबदारी कुटुंब निभावत असताना यशस्वी उद्योजिका म्हणून मला सन्मान केला यामुळे मला माझा व्यवसाय सांभाळत अधिकचे कष्ट करण्याचे बळ मिळाले व मिळालेल्या सन्मान बद्दल माझे आयुष्यातील पहिल्यादांच कौतुकाची थाप मिळाली त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष व अध्यक्ष ज्योती लडकतव टीम यांचे मी ऋणी आहे.
----- रूपाली राजेंद्र ननवरे -----
सोमेश्वर करंजे (ता बारामती)



