सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे असणारी सोमेश्वर वाचनालयाची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण उत्साहात
आज दि २७ शनिवार रोजी सकाळी ठीक ११.३०.वा. सोमेश्वर वाचनालय सोमेश्वरनगर या ठिकाणी आयोजित केली होती. सभेची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती दीप प्रज्वलन करून झाले त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी अध्यक्षस्थानी वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल निगडे सर हे होते. सभेचे प्रस्ताविक व वाचनालयाची सखोल माहिती डॉ.संजू जाधव सर यांनी दिली तसेच सभेचे सूचना वाचन मा.श्री उदयसिंह जगताप कार्यवाह यांनी केले व सूत्रसंचालन मा. श्री रवींद्र होळकर उपकार्यवाहक यांनी केले. त्याचप्रमाणे वार्षिक अहवाल व ऑडिट प्रमाणे जमा खर्च वाचन प्रा .डॉ.अजय दरेकर यांनी केले तसेच सन २०२५ -२६ चे अंदाजपत्रक वाचन अनिल निगडे यांनी केले.
वार्षिक सर्व साधारण सभेचे आयोजन ग्रंथपाल श्री जितेंद्र जगताप यांनी केले होते.
सर्वसाधारण सभेपुढील सर्व विषयावर सखोल चर्चा झाली व काही विषयावर निर्णय घेण्यात आले मागील सन- २०२३-२४ चा इतिवृत्तांत वाचून कायम करण्यात आला व सन. २०२४ -२५ च्या जमाखर्चास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली .
तसेच वाचनालयामध्ये कार्यकारी मंडळाने केलेल्या कामाचा आढावा खालील प्रमाणे देण्यात आला त्यामध्ये पंचक्रोशीतील गरीब व होतकरू मुलांसाठी अल्प दरात अभ्यासिका चालू केली तसेच त्या विद्यार्थ्यांना व इंटरनेट वाय-फाय सेवा मोफत देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांसाठी व पंचक्रोशीतील वाचक वर्ग सभासदांसाठी व्याख्याने सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.
वाचनामध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांच्या मागणी नुसार व वाचक वर्ग सभासद वर्गाच्या मागणीनुसार पुस्तके खरेदी केली जातात. त्याचप्रमाणे वाचनासाठी नियमित १६ वर्तमानपत्रे ७१ नियतकालिके व मासिके ,साप्ताहिके, दिवाळी अंक हे मोफत वाचावयास दिली जातात. ज्येष्ठ नागरिक व युवक वर्ग लहान मुले ,महिला, यांच्यासाठी बसण्याची बैठक व्यवस्था स्वतंत्र आहे. वाचनालय तर्फे मु.सा. काकडे महाविद्यालयातील व सोमेश्वर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील पदवी प्राप्त पुरस्कारथी तसेच अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण यश संपादन केलेल्या सर्वांचे सत्कार करण्यात आले .
मा. अध्यक्ष यांनी पंचक्रोशीतील विद्यार्थी वर्ग वाचक वर्ग सभासद यांनी वाचनालयात येऊन ग्रंथसंपदा व वर्तमानपत्रे ,नियतकालिके ,नियमित वाचावयास येऊन वाचन साहित्याचा उपभोग घ्यावा असे आव्हान केले व वाचनालयाची शोभा वाढवावी . त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार अनिल भोसले सर यांनी मानले सर्व सदस्यांना व मान्यवरांना अल्पोहार व चहा पण देऊन सभा संपन्न झाली.



