Type Here to Get Search Results !

श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थानाला ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व असल्याने याठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात; त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन परिसर विकास आराखडा तयार करा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. 

श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि बारवाचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, कार्यकारी अभियंता अमोल पवार, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी किशोर माने, पंचायत समितीचे उप अभियंता शिवकुमार कुपल, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे, श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत मोकाशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. पवार यांनी श्री सोमेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर परिसरातील कामांची पाहणी करतांना ते म्हणाले, श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान येथे येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही, यादृष्टीने विकासकामे करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्यावतीने देशी झाडाला प्राधान्य दिले असून या परिसरात हवामानारुप वृक्षारोपण करावे. झाडांच्या मुळ्या बाहेर आल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करा. देवस्थान परिसर स्वच्छ राहील, याबाबत ट्रस्टने दक्षता घ्यावी. दुकानाच्या गाळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन अहवालप्रमाणे कार्यवाही करावी. 

मौजे सोमेश्वर (करंजे) येथे वाहनतळ बांधकामाकरिता ७७ लाख २९ हजार ७२५ इतक्या रुपये तसेच संरक्षक भिंतीचे बांधकामाकरिता ५१ लाख ३ हजार ७०६ इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आगामी ५० वर्षाचा विचार करुन विकास आराखड्यात महिला व पुरुष स्वच्छतागृह, देवास्थानाचा मुख्यद्वार, पायरी, विद्युतव्यवस्था, अन्नछत्रालय, भक्त निवास, रस्ते, पाणी, सोलर पॅनेलची व्यवस्था, वाहनतळ, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, भाविकांना बसण्याची व्यवस्था आदी सुविधांचा समावेश करुन विस्तृत आराखडा तयार करा, अशी सूचना श्री. पवार यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test