बारामतीच्या पश्चिम भागात गुलालाची उधळण "गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या"च्या जल्लोषात गणपती बाप्पाला निरोप.
सोमेश्वरनगर- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक गणरायाच्या आगमनाला मोठे स्थान आहे कोणी दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा तर दहा दिवसाचा गणपती ठेवत असतो यामध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन व निरोप देण्यात येत असतो बारामतीच्या पश्चिम भागातील सोमेश्वरनगर परिसरात गणपतींच्या मिरवणुकीला सर्वत्र वाड्या वस्तीवरील तसेच गावा गावामध्ये मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि "गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या"च्या घोषणांनी संपूर्ण सोमेश्वर पंचक्रोशी दुमदुमून गेली होता. अनेक गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले तर विविध देखावे सादर केले तर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्ताने सर्वच जाती-धर्माचे लोक एकत्र येत गणेश उत्सव साजरा करतात त्यामुळे गणेश उत्सव हा एक आगळावेगळा उत्सव म्हणून पाहिले जाते शनिवार दि.६रोजी सार्वजनिक आणि घरगुती गणपती विसर्जनाला मोठ्या भक्तीमय वातावरणात सर्वत्र संपन्न झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करंजपूल दुरक्षेत्र चे पोलीस उपनिरीक्षक राहुल सावळे व दीपक वारुळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला सर्वच गणेश मंडळांनी सहकार करत वेळेत गणेश मिरवणूक व विसर्जन केले गावागावातील पोलीस पाटील तसेच आजी माजी सैनिक संघटना यांनीही पोलीस बंदोबस्तमध्ये आपले सहकार्य नोंदवले निरा डावा कालवा बंद असल्याने व यावर्षी अधिकचा पाऊस काळ मुळे सोमेश्वर मंदिर येथील पाण्याचा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असल्याने गणपती विसर्जनासाठी घरगुती व गणेश मंडळांनी या तलावात गणेश मूर्ती विसर्जन करणे पसंत केले. गणेश भक्तांनी श्री गणेशाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या असा भावपूर्ण प्रार्थना व निरोप दिला . चांगला पाऊस काळ पडुदे सर्वांचे आरोग्य, उद्योग व्यवसाय , सामाजिक एकोपा व शेतकरी समाधानी राहू दे अशी प्रार्थना केली.