सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. २२ लाख रुपये खर्च करुन या इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून ग्रामसचिवालय, सभागृह, स्वच्छतागृह आदी कामे करण्यात आली आहेत.
उदघाटन प्रसंगी गट विकास अधिकारी किशोर माने, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शंभाजी होळकर, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, आरोग्य व मा बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कारखाना संचालक ऋषिकेश गायकवाड, पंचायत समिती मा सदस्य अप्पासाहेब गायकवाड, मेनका मगर,पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, करंजेपुल माजी सरपंच वैभव गायकवाड, सरपंच पूजा गायकवाड, उपसरपंच शेखर गायकवाड, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी सचिन लिंबरकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत शेंडकर, किरण गायकवाड, अनिता गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत नाना गायकवाड, बाळू गायकवाड, प्रणय गायकवाड, लक्ष्मण लकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



