सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याअंतर्गत करंजेपुल दुरक्षेत्र येथे चोपडज येथील तुषार विकास गायकवाड हा मोटारसायकल रेस वाढवून चालवत असताना सोमेश्वर चौकीतील पोलीसांना मिळुन आला करंजेपुल पोलीसांनी सदर असणारी गाडी कंपनी यमाहा मोटारसायकल ची पाहणी केली असता त्यास पुढील बाजूस समोरून येणाऱ्या लोकांच्या डोळ्याला त्रास होईल अशा चायनीज एल ई डी लाईट बसवल्याचे आढळून आले सदर एल ई डी लाईटचा वापर करण्यास बंदी असुन तो लाईट लावल्यानंतर समोरून येणाऱ्या वाहण चालकांना रस्ता दिसत नाही व त्यामुळे अपघाताची शक्यता असते पोलीसांनी तुषार गायकवाड यांच्या मोटारसायकलवर कायदेशीर कारवाई केली असुन त्यांची मोटारसायकल पोलिसांनी जप्त केले असून सदर मोटारसायकल मालकास आर टि ओ विभागाने पोलीसांच्या रिपोर्ट वरुन चोवीस हजार रूपये दंड केला असुन मोटारसायकल मालकास सदर दंड भरुन मोटारसायकल घेऊन जाण्याचे आदेश दिले आहेत तसेच या पुढे अशा नियम बाह्य मोटारसायकल चालवल्यास अशाच प्रकारे दंडात्मक कारवाई केल्या जातील. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी दिली.
__________________________________
या कारवाईमुळे आरटीओ नियमाच्या विरोधात जे बाईक स्वार गाडी चालवत आहेत त्यांना एक प्रकारे चांगलीच जरब बसेल.
तसेच परिसरात विविध प्रकारच्या घडत असलेल्या गुन्हेगारीवर तक्रारी थेट द्याव्यात नाव गोपनीय ठेवण्यात येईल
--- पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे



