पळशी हद्दीतील बंद असलेल्या पडक्या घरात जुगार खेळणाऱ्या वर छापा... मुद्देमाल जप्त ; वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची कारवाई.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पळशी गावचे हद्दीतील पिंगळेवस्ती येथील भाऊसाहेब करे यांचे बंद असलेल्या पडक्या घराचे आडोशाला मोकळया जागेत मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दि 12 रोजी दुपारच्या सुमारास 13 पानी नावाचा जुगार पैसे लावूनजुगाराचा खेऴ खेळत असताना मिळुन आले यामधील
रोख रक्कम सह वाहने मिळून आलेले आहे नमुद केले तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपीत मजकुर हे वरील वर्णणाचा व किंमतीचा माल व साधणे यांचा वापर करुन स्वतःचे फायदे करिता आहेत.गुन्हा रजिस्टरी दाखल केला असुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्याची तजवीज ठेवलेली आहे
विकास बळवंत येटाळे पोलीस शिपाई वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन. यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 1) मारूती आण्णा इजगुडे वय 52 वर्षे 2) नारायण विट्ठल करे वय 52 वर्षे 3) संतोष जयसिंग गुलदगड वय 40 वर्षे 4) रघुनाथ जगन्नाथ सोनवलकर वय 65 वर्षे 5) अंकुश विठोबा केसकर वय 50 वर्षे सर्व रा.पळशी 6) गजानन रामा कडाळे 7) लक्ष्मण माने पुर्ण नाव माहित नाही दोघे रा.पळशी येथील आहेत.
पुढील तपास वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व पोलीस निरीक्षक राहुल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना मारकड पो.हवा पन्हाऴे करीत आहेत .



