Type Here to Get Search Results !

Crime News दारु अड्ड्यावर वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशनची धडक कारवाई; ३ जणांवर गुन्हा दाखल करत मुद्देमाल केला जप्त

Crime News दारु अड्ड्यावर वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशनची धडक कारवाई; ३ जणांवर गुन्हा दाखल करत मुद्देमाल केला जप्त


सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील सावंतवस्ती येथे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशनने धडक कारवाई करून ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करत आरोपी विजय सुभाष नवले, अनिल रूपसिंग नवले, शैलेश शंकर नवले या ३ जणांवर मुंबई प्रोव्हीशन कायदा कलम 65 (ई),65 (ब), 65 (फ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले नागनाथ ज्ञानोबा परगे यांनी फिर्याद दिली.

मिळालेल्या माहितीनुसार विजय सुभाष नवले, अनिल रूपसिंग नवले, शैलेश शंकर नवले रा. सावंतवस्ती, वाघळवाडी ता. बारामती जि. पुणे यांनी त्याचे घराचे बाजूला पडीक जागेत अंदाजे 200 लिटर मापाचे लोखंडी बॅलर मध्ये ठेवलेले रसायनाला जाळ लावून काठीने ढवळीत असतांना पोलीसांचा चाहुल लागताच अंधाराचा फायदा घेवुन घराचे पाठीमागील झुडपातुन पळुन गेले सदर ठिकाणची पाहणी करता तेथे
चुलवाणावर पाच बॅलर व त्यामध्ये गावठी हातभटटीची दारू तयार करायचे कच्चे रसायन व रिकामे लोखंडी बॅलर वगैरे वरील वर्णनाचा एकुण 64400/-रूपयाचा माल मिळुन आला. वगैरे
मजकुरावरुन गुन्हा रजिस्टरी दाखल केला असुन गुन्हयाचा वर्दी रिपोर्ट मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्याची तजवीज ठेवलेली आहे.
पुढील तपास वडगाव निंबाळकर चे साहेब पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करंजे पूल दूरक्षेत्र चे पोलीस हवालदार नागटिळक हे करीत आहेत.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test