बारामती ! प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंती( ईद-ए-मिलाद) उत्साहात साजरी
बारामतीः प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची १ हजार ५०० वी जयंती अर्थात ईद-ए-मिलाद बारामती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती आम मुस्लिम जमातीने डीजे विरहित मिरवणूक काढत अनोखा आदर्श ठेवला.
धार्मिक प्रथा-परंपरांचे पालन करीत मुस्लिम बांधवांनी हजारोंच्या संख्येने मिरवणुकीत सहभाग घेतला होता. ठिकठिकाणी कमानी उभ्या करून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. जामा मशिद येथुन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
गुनवडी चौक, कसबा, सुतार नेट, गुनवडी चौक, गांधी चौक, सुभाष चौक, तिरंगा सर्कल करीत इंदापूर चौक, गुनवडी चौक शेवटी जामा मशिद याठिकाणी मिरवणूकीची सांगता झाली.
यावेळी बारामती आम मुस्लिम जमातीचे संस्थापक अध्यक्ष हाजी जब्बार पठाण यांनी सर्व मुस्लिम बांधवांचे आभार मानले. जामा मशिदीचे मौलाना आसिफुल कादरी रजवी यांनी अमन व शांतीसाठी प्रार्थना केली. मिरवणुक शांततेत पार पाडण्यासाठी ॲड.करीम बागवान, ॲड.इन्क्लाब शेख, हाजी समद कुरेशी, हाजी शब्बीर कुरेशी, हाजी कासम कुरेशी, हाजी अमजद बागवान, आलताफ सय्यद, आलताफ बागवान, ॲड.शहानुर शेख,आसिफ खान, इम्तियाज शिकीलकर, हाजी रशिद बागवान, परवेज सय्यद, जमशेद शेख, इरफान इनामदार, सुभान कुरेशी, आशपाक सय्यद, अन्सार आतार, मुनीर तांबोळी, तैनुर शेख, जहीर पठाण, दाऊद शेख, अजहर शेख, जमीर इनामदार, जमीर सय्यद, इ. मोलाचे सहकार्य केले.
एकता ग्रुपच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांनी भेट देऊन जयंतीच्या शुभेच्छा दिल्या
मिरवणुकी दरम्यान बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, राष्ट्रवादी कांग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख चौकामध्ये विविध पक्ष संघटना आणि स्वयंसेवी संस्थांतर्फे मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. डीजे विरहित मिरवणुकीचे नागरिकांनी कौतुक केले. शहर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



