श्री शिवाजी मराठा सोसायटी, पुणे. कारभारी मंडळ अध्यक्षपदी बी. एम. गायकवाड.
पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या नियमक मंडळ व कारभारी मंडळाची सभा संस्थेत दि.१६.१०.२०२५ रोजी झाली. या सभेत कारभारी मंडळ सदस्य व अध्यक्ष यांची नावे एकमताने जाहीर करण्यात आली आहेत ही निवड एक वर्षापुरती असते.
बी.एम. गायकवाड यांची कारभारी मंडळ अध्यक्षपदी निवड एकमताने करण्यात आली आहे. सदर कारभारी मंडळ सभेत सदस्य, सुरेश देसाई, डॉ. नितीन पवार, गंगाधर घारे, अॅड. एन.डी. पाटील, संजय थोरात, पद्माकर पवार, जयप्रकाश जगताप, प्रदीप जेधे तर पदाधिकारी विकास गोगावले, जॉईंट सेक्रेटरी सत्येंद्र कांचन, अध्यक्ष नियमाक व खजिनदार जेधे इ. उपस्थित होते.बी.एम. गायकवाड हे सेवानिवृत्त शासकिय अधिकारी असून लक्ष्मीबाई दगडुशेठ हलवाई दत्त मंदिराचे कार्यकारी विश्वस्त होते. प्रशासकिय, वित्त विभागाच्या कामाचा अनुभव असून सामाजिक कामाची आवड आहे. त्यांच्या निवडचे सर्वच अभिनंदन व स्वागत केले जात आहे.