न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी येथे तालुकास्तरीय विविध स्पर्धेचे आयोजन
सोमेश्वरनगर - संयुक्त विद्यामानाने मेरा युवा भारत पुणे युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा सोमवार दि ६ ऑक्टोंबर २०२५ रोजी बारामती तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस वाणेवाडी येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा ,१०० मीटर धावणे, गोळा फेक ,लांब उडी या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य मानसिंग जाधव , क्रीडा शिक्षक अशोक भोसले , व इतर शिक्षक होते क्रीडा स्पर्धा म्हणजे खेळाडू किंवा संघांमध्ये होणारी एक संघटित ऍथलेटिक स्पर्धा, जी विशिष्ट खेळाचे नियम आणि नियमांनुसार आयोजित केली जाते. यामध्ये विविध स्तरांवरील स्पर्धांचा समावेश होतो, जसे की ऑलिम्पिक खेळ, विश्वचषक, कबड्डी गोळा फेक १०० मीटर धावणे लांब उडी खेळ किंवा राष्ट्रीय शालेय स्पर्धा. खेळाडू त्यांची शारीरिक क्षमता पणाला लावून उत्कृष्ट प्रदर्शन करतात आणि जिंकण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे एक रोमांचक आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण होते.
अनेक खेळाडूंनी व अनेक संघ १८० विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग घेतला होता