सोमेश्वरनगर परिसरात फिरताय सावधान ...फटाकडे वाजवणाऱ्या बुलेट व नियमबाह्य वाहनांवर होणार कारवाई
वडगाव निंबाळकर पोलिसांच्या कडून दोन मोटारसायकल चालकावर मोठी कारवाई.सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर ही मोठी बाजारपेठ आहे व शाळा कॉलेज महाविद्यालय यामुळे सोमेश्वर हे शैक्षणिक दृष्ट्या मोठे शैक्षणिक संकुलन असल्याने येथे सततची मोठी गर्दी असते या बाजारपेठेत विविध प्रकारच्या गाड्या .. नियमबाह्य गाड्या तसेच ट्रिपल सीट आणि फटाकडे वाजवणाऱ्या बुलेट फिरत असतात यावर लक्ष करंजेपुल पोलिसांचे होतेच व आहे त्यामुळे यापुढे सोमेश्वरनगर परिसरात दुचाकी चारचाकी फिरवत असाल तर आपली सर्व कागदपत्रे, अल्पवयीन मुलांना गाडी न देणे, ट्रिपल सीट न बसवणे , एचआरसीएफ नंबर प्लेट असणे, दुचाकी चार चाकी चालवण्याचे लायसन असणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास गाडी जप्त तर मोठा दंडात्मक कारवाई करणार असल्याचे करंजेपुल दूरक्षेत्रेचे पीएसआय राहुल साबळे यांनी बोलताना सांगितले.
वडगाव निंबाळकर पोलिसांच्या कडून दोन मोटारसायकल चालकावर कारवाई करण्यात आली मिळालेले माहितीनुसार फटाके वाजवणाऱ्या बुलेट चालकावर ३५,०००/- रुपयेचा व विना नंबर प्लेट पल्सर चालवणाऱ्या चालकावर १६,०००/- रुपये दंड व दंड भरून आपली वाहन बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर अंकित कंरजेपूल दुरक्षेत्र येथून सोडवुन नेण्याबाबत पोलीसानी आदेश केले आहेत तर काही दिवसापूर्वी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांनी नाकाबंदी मध्ये फटाके वाजवून बुलेट चालवणाऱ्या बुलेट चालक श्रेयस तानाजी खोमणे रा. तरडगाव व विना नंबर प्लेट पल्सर वाहन चालवणाऱ्या वाहन चालक / मालक सोमनाथ शिवाजी मदने रा. तडवळे ता.फलटण जि.सातारा यांच्या मोटारसायकल ताब्यात घेऊन मोटर व्हेरिकल कायदा कलम २०७ प्रमाणे सदर वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर पोलीसांनी कारवाई केली असून त्यांना वर नमूद केल्याप्रमाणे दंड करण्यात आला आहे. दंड भरून सदरची वाहने सोडून घेऊन जाण्याचे आदेश पोलिसांनी वाहन चालकांना केले आहेत. नियम बाह्य कायदा मोडून असे वाहन चालवल्यास अशा प्रकारेच दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामार्फत केला आहे.
सदरची कारवाई वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपूल दूररक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे सह उपनिरीक्षक दीपक वारुळे, पोलिस नागटिळक, भोसले, देशमेन, कडवळे पोलिस शिपाई निलेश जाधव ,परगे यांनी केली.