Type Here to Get Search Results !

रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन, आधुनिक शेती पद्धती व उत्पादनवाढीबाबत मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्रचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले.

रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन, आधुनिक शेती पद्धती व उत्पादनवाढीबाबत मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्रचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले
बारामत : कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगामपूर्व पीक नियोजन अभियान अंतर्गत मौजे बाबुर्डी, पानसरेवाडी, दंडवाडी, बोरकरवाडी, आंबी खुर्द, तरडगाव व लोणीभापकर या गावांमध्ये शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले.

यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन, आधुनिक शेती पद्धती व उत्पादनवाढीबाबत माहिती दिली.

तालुका कृषि अधिकारी सचिन हाके यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व मोहिमांबाबत माहिती दिली. त्यामध्ये महाडीबीटी, मनरेगाअंतर्गत फळबाग लागवड, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, ठिबक सिंचन, अवजारे बँक, वैयक्तिक व सामूहिक शेततळे आदींचा समावेश आहे.

डॉ. विवेक भोईटे, डॉ. संतोष करंजे व डॉ. रतन जाधव यांनी रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी, लसूण, जवस, चारा मका व मुरघास या पिकांबाबत सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ, उप कृषि अधिकारी प्रशांत मोरे, बापु लोदाडे, सहायक कृषि अधिकारी दिलीप यादव, अमोल लोणकर, प्रवीण चांदगुडे, गणेश कदम, भिमराव लोणकर, स्वप्निल गायकवाड तृप्ती गुंड उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test