Type Here to Get Search Results !

खुन करून मृतदेह मुरूमाच्या ढिगा-यात गाढुन ठेवणा-या आरोपीस कर्नाटक राज्यातुन शिताफीने अटक.

खुन करून मृतदेह मुरूमाच्या ढिगा-यात गाढुन ठेवणा-या आरोपीस कर्नाटक राज्यातुन शिताफीने अटक.
बारामती - बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन हदट्टीतील मानव मिसिग नंबर २२/२०२५ प्रमाणे दि.२४/०९/२०२५ रोजी दाखल असलेल्या मिसिंगचा तपास चालु असताना मा. मनोजकुमार नवसरे, सहायक पोलीस निरीक्षक सुपा पोलीस स्टेशन यांना फोनव्दारे माहिती मिळाली की, मौजे नारोळी ता. बारामती जि पुणे गावचे हददीत छाया रमेश महाडिक यांचे बांधकाम चालु असलेल्या फार्म हाउसचे मुरूमाचे ढिगा-याखालुन कसलातरी उग्र वास येत आहे. सदरचा माहिती मिळताच सपोनि नवसरे साो, यांचे सोबत पोलीस स्टाफ असे सरकारी वाहनाने सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता सदर ठिकाणी एक अनोळखी पुरूष मयत बॉडी मुरूमाखाली पुरलेल्या अवस्थेत मिळुन आली सदर बॉडीची पाहणी केली असता सदरची मयत बॉडी ही सुपा पोलीस स्टेशन मानव मिसिंग नंबर २२/२०२५ मधील मिसिंग नामे गणेश शंकर चव्हाण वय ४९ वर्षे, रा. आंद्रफळी ता. शिराटी जि.गदक राज्य कर्नाटक सदया रा. नारोळी ता. बारामती जि पुणे याची असल्याचा संशय आल्याने त्याचे नातेवाईक यांना बोलावुन खात्री केली असता नातेवाईकांनी ओळखुन सदर बॉडी ही गणेश शंकर चव्हाण याची असल्याचे सांगितले. सदर मयताचे प्रथमदर्शी तपासात मयताचा खुन हा नागराज उर्फ नागेश विरूपक्षाअप्पा गडियप्पनवर वय ३४ वर्ष, रा. असुंडी ता.राणेबेन्चुर जि. हावेरी राज्य कर्नाटक याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून खुन केल्याचा निष्पन्न झाले. सदर बाबत रूपेश दिनानाथ साळुंखे पो. हवा. २१८७ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नामे नागराज उर्फ नागेश विरूपक्षाअप्पा गडियप्पनवर वय ३४ वर्ष, रा. असुंडी ता.राणेबेन्नूर जि. हावेरी राज्य कर्नाटक याचेविरूध्द सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं.१७०/२०२५ भा.न्या. संहिता कलम १०३,२३८ प्रमाणे गुन्हा दाखल केला. मा. सपानि नवसरे साो, यांनी आरोपीचा शोध घेणेकामी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्या २ टिम तयार करून आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या व तपास पथके रवाना केली. सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक माहिती तसेच गोपनिय माहीतीचे आधारे सदर आरोपी हा ता. राणेबेन्चुर जि. हावेरी राज्य कर्नाटक येथे असल्याची माहिती मिळाल्याने मा. सपोनि नवसरे सो, यांनी पोसई जिनेश कोळी यांचे नेतृत्वाखाली पोहा. रुपेश सांळुखे, पो.शि. किसन ताडगे, निहाल वणवे अशी पोलीस स्टेशनची १ टिम आरोपीचे ता.राणेबेन्नुर जि. हावेरी राज्य कर्नाटक येथे रवाना केली. सदर पथकाने ता. राणेबेन्चुर जि. हावेरी राज्य कर्नाटक येथे जावुन स्थनिक पोलीस तसेच गोपनिय बातमीदाराचे

मदतीने आरोपीचा शोध घेतला व त्यास शिताफीने ताब्यात घेतले. तसेच आरोपीस पुढील तपासकामी सुपा पोलीस स्टेशन येथे आनुन त्याचेकडे गुन्हाचे अनुषंघाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुली दिली. तसेच सदर गुन्हयाचे तपासकामी आरोपीस दि.०३/१०/२०२५ रोजी ११.५० वा अटक करून मा. न्यायालयात हजर केला असता मा. न्यायालय यांनी आरोपीस दि.०६/१०/२०२५ रोजीपर्यंत ०४ दिवस पोलीस कोठडी दिलेली आहे. पुढील तपास जिनेश कोळी पोलीस उपनिरीक्षक सुपा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री. संदिपसिंह गिल्ल साो, मा. पोलीस अधिक्षक श्री. गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक श्री सुदर्शन राठोड मा.उप. विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. मनोजकुमार नवसरे, पो.स.ई. जिनेश कोळी, पोसई जयंत ताकवणे, पो.हवा. रुपेश साळुंके, संदिप लोंढे, विशाल गजरे, पो. कॉ. तुषार जैनक, किसन ताडगे, सागर वाघमोडे, महादेव साळुंके, निहाल वणवे यांनी केलेली आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test