मुस्लिम बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष नागरि सत्कार संपन्न
बारामतीः मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन तन्वीर इनामदार व व्हाईस चेअरमन ॲड.आयुब शेख यांच्या निवडीमुळे बँकेला आधुनिकतेची जोड मिळून आर्थिक उद्धार झालेशिवाय राहणार नाही असे मत महाराष्ट्र विधान परिषदेचे तालिका सभापती तथा आमदार इद्रिस नायकवडी यांनी व्यक्त केले.
मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन तन्वीर इनामदार व व्हाईस चेअरमन ॲड.आयुब शेख यांची बिनविरोध निवड झालेबद्दल बारामतीच्या सभासदांच्या वतीने जाहिर नागरि सत्कार प्रसंगी अध्यक्षस्थानावरून आ.नायकवडी बोलत होते.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक योगेश जगताप, बारामती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक ॲड. शिरीष कुलकर्णी, आय.एस.एम.टी.चे अध्यक्ष किशोर भापकर, ज्येष्ठ उद्योजक फखरूद्दीन भोरी, माजी मुंबई पोलीस उपायुक्त इसाक बागवान, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षा सौ.अनिता गायकवाड, मुस्लिम बँकेचे संचालक बबलू सय्यद, सादिक लुकडे, सौ.आयेशा फिरोज तांबोळी, सौ.अंजुम सलीम मणियार, माळेगाव कारखान्याचे माजी संचालक दिलीप नाना ढवण पाटील, शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कामरुद्दीन सय्यद इ. मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार इद्रिस नायकवडी,योगेश भैय्या जगताप,सचिन सातव हाजी कामरुद्दीन सय्यद, हाजी शब्बीर कुरेशी इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.
सत्कारमूर्ती तनवीर इनामदार व ऍड.आयुबभाई शेख यांनी सत्कार ला उत्तर देताना भव्य सत्कार आयोजित केल्याबद्दल आयोजक एकता ग्रुप च्या सर्व सदस्यांचे व मुस्लिम बँकेच्या तमाम सभासदांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक व मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बारामती शहरातील कुरेशी बांधव, तांबोळी बांधव, बागवान बांधव, मोमीन बांधव, आत्तार मनेर शिकेलकर पटवेकर बांधव, एकता गृहनिर्माण संस्था, कसबा मुस्लिम जमात, झारी समाज बांधव, दर्गा मस्जिद ट्रस्ट, अश्रफी जलाली भाई ग्रुप, बारामती शहर चिकन विक्री संघटना, अखिल भारतीय हिंदू खाटीक संघटना महाराष्ट्र राज्य, मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक कर्मचारी वर्ग इत्यादी संघटनांच्या वतीने तसेच वैयक्तिक सभासद बांधवांचे वतीने पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकता ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन अल्ताफ सय्यद यांनी केले तर आभार सुभान कुरेशी यांनी व्यक्त केले.