सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट या संस्थेच्या वतीने परिसरातील मुला मुलींसाठी तीन दिवसाचे कराटे कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी झालेल्या येलो बेल्ट स्पर्धेत आर्या जाधव व दिव्यांश कारंडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला हा कॅम्प न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी येथे घेण्यात आला कॅम्पचे उद्घाटन सुनील रघुनाथराव भोसले पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सदस्य यांच्या हस्ते झाले प्रमुख उपस्थिती मा. खरेदी विक्रीचे संचालक विक्रमआप्पा भोसले विक्रम जगताप अशोक भोसले अनिल यादव दुष्यऺत चव्हाण उपस्थित होते संस्थेचे ग्रँडमास्टर प्रकाश रासकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्पर्धेत सोमेश्वर नगर मुरूम वाघळवाडी वायाल पट्टा येतील मुला मुलींनी सहभाग घेतला होता यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे येलो व ऑरेंज बेल्ट: आर्या जाधव मणिकर्णिका वायाळ आरोही होळकर अनया वायाळ आन्विका कारंडे प्रक्षा वायाळ आरोही शिंदे कार्तिकी कारंडे श्राव्या वायाळ दिव्यांश कारंडे मार्तंडमल्हार हाके क्रिशांक वायाळ अभि होळकर सर्वज्ञ वायाळ सोहम वायाळ आरीजय महानवर श्रेयाश जाधव जुई भोसले अदित्य घाडगे खुशी आतार सौम्या खटावकर कार्तिकी कोकरे या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले संस्थेचे चीफ मास्टर धनंजय भोसले यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले संस्थेचे ब्लॅक बेल्ट मास्टर इम्रान बागवान अथर्व बुनगे सोनक महानवर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले



