बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या चार जणांवर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल.
सोमेश्वरनगर - मिळालेल्या माहितीनसार बारामती तालुक्यातील निंबुत गावचे हद्दीत संशयीत मारूती सुझूकी कंपनीची पांढऱ्या रंगाची इर्टिगा गाडी 18 रोजी थांबवून पाहणी केली असता गाडीमध्ये बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टीची तयार दारू असलेले निळे व काळे रंगाचे 35 लिटर मापाचे 06 कॅन्ड मिळून आले. गाडीमधील इसम नामे 1. अनिरूध्द भालचंद्र तुरकंुडे रा.कसबा बारामती ता.बारामती जि.पुणे यास गाडी तील मुद्देमाल बाबत विचारणा केली असता सदरचा मुद्देमाल हा इसम नामे 2. विट्ठल चव्हाण रा.पाहुणेवाडी ता.बारामती जि.पुणे यांनी आणण्यास सांगितले आहे असे सांगितले. सदरचा मुद्देमाल व गाडी जप्त करून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे वरील नमूद आरोपी गुन्हा दाखल केला असून सदर कारवाई मध्ये मुद्देमाल व मारूती सुझूकी कंपनीची पांढÚया रंगाची इर्टिगा गाडी न.एम.एच.42 ए.क्यु.1006 सह एकूण 509600/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सागर देषमाने हे करीत आहेत.2) दिनांक 07/10/2025 रोजी रात्री 10ः00 वाजता च्या दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजे मुर्टी गावचे हद्दीत संशयीत स्कुटी न.एम.एच.42 बी.जी.2389 या गाडीला हात करून थांबवून पाहणी केली असता गाडीवर बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टीची तयार दारू असलेले निळे रंगाचे 35 लिटर मापाचे दोन कॅन्ड मिळून आले. गाडीवरील इसम नामे 1. प्रमोद प्रकाष नवले राहणार निंबुत तालुका बारामती जिल्हा पुणे व 2. शुभम सुरेष षिसोदिया राहणार मारवाडी चाळ दर्पन टाॅकीज दहोद राज्य गुजरात यांना गाडीवरील मुद्देमालाबाबत विचारणा केली असता, उडवा उडवीचे उत्तर दिल्याने सदरचा मुद्देमाल व गाडी जप्त करून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे वरील नमूद आरोपी गुन्हा दाखल केला असून सदर कारवाई मध्ये मुद्देमाल व टी.व्ही.एस. कंपनीची ज्युपीटर मोटार सायकल सह एकूण 57000/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार कुंडलिक कडवळे हे करीत आहेत
दोन्ही कारवाई मध्ये मिळून एकूण 240 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू तसेच 1 दुचाकी व 1 चारचाकी गाडीसह एकूण 566600(पाच लाख सहासष्ट हजार सहाशे रु) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई माननीय संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माननीय गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, माननीय सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली नागनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलीस उपनिरीक्षक दिपक वारूळे, पोलीस हवालदार कुंडलिक कडवळे, सागर देषमाने, पोपट नाळे, पोलीस षिपाई , विलास ओमासे,आबा जाधव, सूरज धोत्रे यांनी मिळून केली.



