शहरातील साडे आठ हजार बालकांचे लसीकरण करण्याचे नियोजन
बारामती : शहरामध्ये १२ ऑक्टोबर रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात येणार असून ०-५ वयोगटातील सर्व बालकांचे पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्यचीकीत्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.
शहरामध्ये एकूण ८ हजार ५०० बालकांना एकूण ५२ लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेकरिता एकूण दोनशे कर्मचारी, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे अधिकाधिक बालकांना लसीकरण करुन घ्यावे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना १३ ते १८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये घरोघरी जावून लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.