Type Here to Get Search Results !

शेतकरी,व्यापार, छोटे मोठे व्यवसायिकांनी ग्राहकसेवा प्रदान करण्याची संधी बँकेस द्यावी - महाव्यवस्थापक चंद्रविलास भामरेमहाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये जवळपास ७४९ शाखा ; सर्व शासकीय योजनांचा लाभ देणारी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची ओळख.

सोमेश्वरनगर ! शेतकरी,व्यापार, छोटे मोठे व्यवसायिकांनी ग्राहकसेवा प्रदान करण्याची संधी बँकेस द्यावी - महाव्यवस्थापक चंद्रविलास भामरे
महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये जवळपास ७४९ शाखा ; सर्व शासकीय योजनांचा लाभ देणारी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची ओळख.

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँक,करंजेपूल या शाखेचा उदघाटन समारंभ गुरुवार दि ९ रोजी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण बँकेबद्दल माहिती देताना बँकेचे महाव्यवस्थापक श्री. भामरे सरांनी सांगितले की महाराष्ट्र ग्रामीण बँक ही संपूर्णपणे शासकीय मालकीची श्येडुल्ड बँक असून अत्याधुनिक CBS प्रणालीद्वारे NEFT/RTGS, UPI, Mobile Banking, Internet Banking, CTS clearing, Rupay Debit card, Platinum ATM card इ. सर्व सेवा आणि सुविधा पुरवल्या जातात. त्यासोबतच बँकेत आकर्षक व्याज देणाऱ्या विविध ठेव योजना असून बँकेतर्फे विविध आकर्षक कर्ज योजनांद्वारे शेतकरी, उद्योजक, व्यापारीवर्ग, नोकरदार वर्ग, बचत गट इत्यादींना पतपुरवठा केला जातो आणि पात्र खातेदारांना सर्व शासकीय योजनांचा लाभ दिल्या जातो. बँकेच्या महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये जवळपास ७५० शाखा असून सप्टेंबर २०२५ अखेर रू.४२००० कोटी इतक्या एकूण व्यवसायाचा टप्पा बँकेने पूर्ण केलेला आहे. त्यामुळे करंजेपूल गावातील आणि परिसरातील सर्व सन्माननीय नागरिकांनी बँकेत त्वरित आपले खाते उघडून उत्तम ग्राहकसेवा प्रदान करण्याची संधी बँकेस द्यावी अशी विनंती आपल्या अध्यक्षीय भाषणात भामरे सरांनी केली.
उदघाटन कार्यक्रमास बँकेच्या पुणे क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक गिरीश चिवटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष राजवर्धनदादा शिंदे, मा.सभापती प्रमोदकाका काकडे, कारखाना संचालक संग्राम सोरटे, अभिजीत काकडे, ऋषिकेश गायकवाड, करंजेपूल दूरक्षेत्र पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळ, माजी संचालक रूपचंद शेंडकर, बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे, सरपंच भाऊसाहेब हुबरे, उद्योजक संतोष कोंढाळकर, निखिल  शेंडकर, सूर्यकांत गायकवाड,संतोष गायकवाड, शिवाजी शेंडकर, सुनिलआबा भोसले, स्वप्निल गायकवाड , सह नागरिक  मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करंजेपूल शाखेचे व्यवस्थापक संदीप कानगुडे, कार्यालयीन सहाय्यक प्रतीक डोंबाळे, मयूर लेंढे, सागर जगताप आदींनी परिश्रम घेतले. 
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिंक्य धुरगुडे तर आभार ब्रॅन्च मॅनेजर संदीप कानगुडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test