Type Here to Get Search Results !

CRIME NEWS मोबाईल टॉवरच्या केबल चोरी करणारी टोळी शिताफीने गजाआड ...सुपा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी

मोबाईल टॉवरच्या केबल चोरी करणारी टोळी शिताफीने गजाआड ...सुपा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी

सुपा - बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन हददीत रात्रगस्त करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की तरडोली (ता. बारामती) गावचे हददीत इंसम नामे शंकर खरात यांचे मालकीचे पञ्याचे शेड मध्ये काही ईसम चोरलेल्या मोबाईल टावरचे केवल तसेच मोटारीची केबल यामधील तांब्याच्या तारा काढत आहेत. सदर मिळाले बातमीची खात्री करण्याकरीता प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पो.हवा. भाग्यवंत, पो.शि. ताडगे, विरमे, मवाळ असे पहाटे ०३:०० वाजताचे सुमारास सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी १) ओम राजेंद्र कासवदे, वय १९ वर्षे, २) संतोष सतिश गायकवाड, वय १९ वर्षे, ३) करण भाउसाहेब आरवडे, वय १९ वर्षे, सर्व रा.मोरगाव, ता. बारामती, जि.पुणे, ४) आण्णा आंबादास कोकाटे, वय २९ वर्षे, रा.कुंभेजा, ता. परांडा, जि.धाराशीव हे केबल मधुन तांब्याच्या तारा काढत असताना मिळुन आले.

सदर ठिकाणची पाहणी केली असता तेथे ३ केबल कटर, टॉवर केबल व सोललेल्या तांब्याच्या तारा मिळुन आल्या. सदर मिळुन आलेल्या मालाबाबत त्यांच्या कडे चौकशी केली असता ते कोणत्याही प्रकारचे समाधानकारक स्पष्टीकरण देवु न शकल्याने त्याचे विरूदध सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं.१७७/२०२५ महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर इसमांकडे अधिक चौकशी केली असता सदरची केबल त्यांनी दि.०३/१०/२०२५ रोजी ते दि.०६/१०/२०२५ रोजीचे दरम्यान सुपा पोलीस स्टेशन हददीतील मौजे तरडोली, बाबुर्डी, कुतवळवाडी गावचे हददीतील मोबाईलचे टॉवर वरील केबलची चोरी करून त्या सोलुन त्यामधील तांब्याच्या तारा काढलेल्या आहेत अशी कबुली दिली. सदर चोरी बाबत मोबाईल टॉवरचे मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन सुपा पोलीस स्टेशन १) गुन्हा. रजि.नं. १७८/२०२५ बी.एन.एस.३०३ (२), ३(५), २) गुन्हा.रजि.नं. १७९/२०२५ बी.एन.एस. ३०३(२), ३(५), ३) गुन्हा. रजि.नं. १८०/२०२५ बी.एन.एस.३०३ (२), ३(५) प्रमाणे एकुण ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर इसम यांना गुन्हाचे कामी अटक करून त्यांना दि.०९/१०/२०२५ रोजी मे. कार्टात हजर केले असता मे. काटनि त्यांना दि.१०/१०/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमान्ड मंजुर केला आहे. त्यांच्या कडुन गुन्हातील चोरीस गेलेला मुददेमाल व गुन्हात वापरलेल्या दोन मोटर सायकली असा एकुण अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हाचा पुढील अधिक तपास करीत सहा. फौजदार वाघोले व पो.हवा. गजरे करीत आहेत. सदर आरोपी यांचे कडे मोबाईल टॉवरचे केबल चोरीच्या अनुषंगाने अधिक तपास चालु असुन आणखीण काही गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी संदिपसिंह गिल्ल साो, पोलीस अधिक्षक, . गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक बारामती,. सुदर्शन राठोड उप. विभागीय पोलीस अधिकारी यांचें मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मनोजकुमार नवसरे, पोसई कोळी, पोसई मोहरकर, पोसई जयंत ताकवणे, सहा फौजदार वाघोले, पो.हवा. राहुल भाग्यवंत, विशाल गजरे, रुपेश साळुंके, संदिप लोंढे, अनिल दणाने पो.कॉ अमोल चिरमे, किसन ताडगे, महादेव साळुंके,  तुषार जैनक,निहाल वणवे, सागर वाघमोडे, सचिन दरेकर, यांनी केलेली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test