ऑनलाइन पुनर्मुल्यांकनात चौथ्या चक्रात A++ मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय
मुख्य संपादक विनोद गोलांडे.....
बारामती - अनेक दशकांपासून शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा जपणाऱ्या अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती या प्रतिष्ठित संस्थेला राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (NAAC) कडून A++ हा सर्वोच्च दर्जा प्राप्त झाला आहे.
हा दर्जा मिळवून महाविद्यालयाने उच्च शिक्षण क्षेत्रात उत्कृष्टतेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. NAAC च्या चौथ्या चक्रातील मूल्यमापनात महाविद्यालयाने 3.51 CGPA मिळवून हा बहुमान प्राप्त केला.
NAAC A++ या सर्वोच्च दर्जाने महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण कार्याची अधिकृत दखल घेतली असून, हा मानाचा तुरा महाविद्यालयाच्या शिरपेचात रोवला गेला आहे.
या यशामध्ये अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर ), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), खजिनदार विकास शहा (लेंगरेकर) व सन्माननिय संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, IQAC समन्वयक प्रा.डॉ. योगिनी मुळे, सहसमन्वयक प्रा.डॉ. सचिन गाडेकर, सहा. सहसमन्वयक उपप्राचार्य डॉ. अरुण मगर, उपप्राचार्य डॉ. अशोक काळंगे तसेच सर्व क्रायटेरिया प्रमुख सर्व सदस्य, अधिष्ठाता, उपप्राचार्य, प्रबंधक अभिनंदन शहा सर्व विभागप्रमुख सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा मोलाचा वाटा आहे.
------------------------
“या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यवस्थापन यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. भविष्यातही शैक्षणिक, संशोधन व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास कायम ठेवण्याचा निर्धार आम्ही केला आहे.”
____प्राचार्य डॉ. अविनाश जगताप___



