Type Here to Get Search Results !

'सोमेश्वर' येथे "रन फॉर यूनिटी" या सरकारी अभियानांतर्गत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आयोजित एकता मरेथॉन संपन्न....चारशेपेक्षा अधिक धावपटूंनी उस्फूर्त सहभाग.

'सोमेश्वर' येथे "रन फॉर यूनिटी" या सरकारी अभियानांतर्गत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आयोजित एकता मरेथॉन संपन्न.
चारशेपेक्षा अधिक धावपटूंनी उस्फूर्त सहभाग.

सोमेश्वरनगर: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित पुणे ग्रामीण पोलिस दलांतर्गत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या वतीने बारामती तालुक्यातील करंजेपुल येथे आयोजित केलेल्या 'रन फॉर यूनिटी या सरकारी अभियानांतर्गत मरेथॉनचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते .
स्पर्धेच्या स्वरूपामध्ये मुलांसाठी पाच किलोमीटर तसेच मुली, ज्येष्ठ महिला व पुरुष यांच्यासाठी दोन किलोमीटर स्पर्धा होती. यामध्ये विविध गावातील भागातून चारशेपेक्षा अधिक धावपटूंनी उस्फूर्त सहभाग नोंदविला. पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी व आंतरराष्ट्रीय धावपटू जगन्नाथ लकडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय बेसबॉलपटू रेखा धनगर यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेची सुरवात करण्यात आली व स्पर्धकांना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, रिल्सस्टार सूरज चव्हाण , दक्षता कमिटी अध्यक्ष सुचिता साळवे,आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष ताराचंद शेंडकर , ॲड गणेश आळंदीकर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला 
    याप्रसंगी अंकुश दोडमिसे, वैभव गायकवाड, स्वप्नील गायकवाड, गणेश सावंत,स्वप्नील गायकवाड, मयूर कोळपे, अॅड. नवनाथ भोसले उपस्थित होते. स्पर्धेसाठी दीपक साखरे, अॅड, गणेश आळंदीकर, दिग्विजय मगर, विजय कोळपे, जितेंद्र सकुंडे यांनी सहकार्य केले. सोमेश्वर माजी क्रीडाशिक्षक संजय होळकर, डी. वाय, जगताप, शशिकांत जेधे, सोमनाथ जाधव, दत्तराज जगताप आदींनी पंच म्हणून चोख व पारदर्शक काम बजावले . 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज शिंदे यांनी केले तर पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी उपस्थित मान्यवर स्पर्धक यांचे मनःपूर्वक आभार मानले.
____________
सोमेश्वर येथे पार पडलेल्या मिनी मरॉन स्पर्धेत काकडे महाविद्यालयाच्या सुजल सोमनाथ सावंत याने मुलांमधून तर सोरटेवाडी माध्यमिक विद्यालयाच्या वनिता लालासाहेब ठोंबरे हिने मुलींमधून विजेतेपद पटकाविले. दरम्यान, ज्येष्ठ महिला गटातून मयूरी गायकवाड तर ज्येष्ठ पुरुष गटातून रवींद्र कोरडे हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
___________
सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्वच आजी-माजी पदाधिकारी , सैनिक संघटना, सोमेश्वर पंचक्रोशी मोठ्या संख्येने असणारे स्पर्धक यांनी सहकार्य केल्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असल्याने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन वतीने सर्वांचे आभार.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test