निधन वार्ता ! करंजेपुल माजी सरपंच तसेच सोमेश्वर कारखाना मा.कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड यांचे निधन.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपूल माजी सरपंच तसेच माजी कामगार संचालक बाळासाहेब विठ्ठल गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते ६५ वर्षांचे होते.
बाळासाहेब गायकवाड यांनी करंजेपुल गावचे सरपंच, करंजे सोसायटीचे चेअरमन,करंजे पतसंस्थेत चेअरमन, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कामगार संचालक आशा अनेक पदांचा त्यांनी कार्यभार सांभाळला होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली , दोन भाऊ आसा परिवार आहे.
बाळासाहेब गायकवाड हे मनमिळावू ,रोखठोक, प्रेमळ, सामाजिक कार्यात अग्रेसर तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होत असल्याने सोमेश्वर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
______________
कै.बाळासाहेबबापू विठ्ठल गायकवाड यांचा अंत्यविधी उद्या शनिवार दि.८/११/२०२५ रोजी सकाळी ८ वाजता करंजे स्मशानभुमि येथे होईल.



