सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील निंबूत-कांबळेश्वर जिल्हा परिषद गटातील निवडणुकीवर राजकीय निरीक्षकांचे लक्ष असताना, या गटात भारतीय जनता पक्षाने आता आक्रमक मोड घेतला आहे. भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून तरुण आणि कार्यक्षम चेहरा म्हणून ओळखले जाणारे दिग्विजय काकडे यांचे नाव चर्चेत आले आहे. यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.
भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या दिग्विजय काकडे यांनी बारामती तालुक्यात पक्षाची विचारसरणी आणि विकासधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी तसेच शेतकरी,विविध पंथ-जात-धर्म आणि राजकीय विचारांच्या लोकांशी त्यांनी उत्तम सुसंवाद जपला आहे. त्यामुळे ‘विभाग नाही, संवाद हीच ताकद’ अशी त्यांची प्रतिमा स्थानिक पातळीवर दृढ झाली आहे.
पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी अनेक जनहितकारी उपक्रम हाती घेतले.
रक्तदान शिबिरे.
गरजूंसाठी शैक्षणिक साहित्य वाटप.
दिवाळीपूर्वी साखर व रेशनकिट वाटप.
सर्वरोग निदान शिबिरे.
बांधकाम कामगार आणि सर्वसाधारण कुटुंबांना भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी तातडीची मदत.
या सर्व माध्यमांतून त्यांनी जनतेत विश्वास निर्माण केला आहे.
युवकांची संघटन बांधणीसाठी सक्रिय राहून रोजगारसंधी, शैक्षणिक मार्गदर्शन, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांत युवकांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. “राजकारण म्हणजे केवळ निवडणूक नव्हे, तर सतत सामाजिक जबाबदारी पार पाडणे” असा त्यांचा कार्यधर्म स्थानिकांमध्ये पसंत पडला आहे.
भाजपमध्ये प्राथमिक चर्चा सुरू असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे त्यांच्या नावावर सकारात्मक विचार सुरू असून, जिल्हा परिषद गटात दिग्विजय काकडे हे भाजपचे अधिकृत चेहरा होण्याची शक्यता मजबूत होत आहे .
स्थानिक पातळीवर उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून, या नावाला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.



