सोमेश्वरनगर - सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेले व खरे क्रीडा प्रेमी असलेले व्यक्तिमत्व राजवर्धन शिंदे असून क्रीडा क्षेत्रासाठी त्यांचे योगदान मोठे असल्याचे जगन्नाथ लकडे यांनी मत व्यक्त केले.
सोमेश्वर कारखाना माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांचा वाढदिवस सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम दादा जगताप,उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्यासह विविध मान्यवर वर्गांचे उपस्थितीत मुरूम येथे साजरा करणेत आला. पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी त्यांना जपानी लोक आनंदी कसे राहतात त्याचे रहस्य उलगडणारे ईकिगाई हे पुस्तक भेट दिले.
यावेळी आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष ताराचंद शेंडकर ,सैनिक संघटना तक्रार कमिटी अध्यक्ष ॲड गणेश आळंदीकर,पत्रकार विनोद गोलांडे,त्रिमूर्ती पतसंस्था संस्थापक डॉक्टर सावंत,उद्योजक आर एन शिंदे इत्यादी मान्यवर हजर होते.



