सोमेश्वरनगर:दिल्ली येथील श्यामाप्रसाद नॅशनल स्टेडियम येथे १ ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत ६९ व्या नॅशनल स्कूल गेम संपन्न झाल्या.या संपन्न झालेल्या राष्ट्रीय शालेय जलतरण (ब्रेस्ट स्ट्रोक १०० मीटर) स्पर्धेत मु.सा काकडे महाविद्यालयातील आर्यवीर अश्विनकुमार पाटील (इयत्ता १२वी वाणिज्य १९ वर्ष वयोगटात रोप्य पदक🥇🥇🥇 प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव देशपातळीवर उज्वल केले. आर्यवीर चे महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे-देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे-देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर, संस्थेचे सचिव सतीश लकडे यांनी महाविद्यालयाच्या
वतीने यशस्वी खेळाडूचे अभिनंदन केले. यशस्वी खेळाडूला प्रा.डॉ.बाळासाहेब मरगजे,प्रा.दत्तराज जगताप, सुप्रिया पाटील यांनी मार्गदर्शन केले.



