सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील शांत संयमी व्यक्तिमत्व असलेले प्रकाश गायकवाड यांच्या कन्या काजल व दौंड तालुक्यातील खोर येथील रोहिदास रामभाऊ तावरे यांचे सुपुत्र वैभव यांचा साखरपुडा समारंभ अत्यंत आनंदात व साधेपणात पार पडला. विशेष म्हणजे, या समारंभातच दोन्ही कुटुंबांनी परस्पर संमतीने मध्यस्थी करत विवाहाचा निर्णय घेतला. अनावश्यक खर्च टाळत वेळ, पैसा आणि ऊर्जा वाचविणाऱ्या या निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत केले.दोन्हीही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक असल्याने या मध्ये फारशा अडचणी जाणवल्या नाहीत.
या मध्यस्थी प्रक्रियेत एसटीचे विभागीय अधिकारी रमाकांत गायकवाड व हेमंत (बाळासाहेब) गायकवाड यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावत साखरपुड्यातच विवाह समारंभ यशस्वीरीत्या पार पाडला. मुलाचे मामा सुनिल गायकवाड, मुलीचे वडील प्रकाश गायकवाड तसेच दोन्ही बाजूंचे बंधू व चुलत बंधू यांनीही या समन्वयात सक्रिय सहभाग नोंदवला.
समाजात वाढत्या दिखावूपणा व खर्चिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर साधेपणाचा व व्यावहारिकतेचा आदर्श घालणारा हा विवाह सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.



