सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये शुभम गणेश जाधव वय १६ पियुष विलास मोहिते वय १५ वर्षे दोन्ही राहणार मुर्टि (ता बारामती) यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी अमिश दाखवून फुस लावून पळवून नेले होते. त्याबाबत मुलाचे पालक गणेश दामू जाधव राहणार मुर्टि यांनी दिनांक २५ रोजी फिर्याद वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे दाखल होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करीत असताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे यांनी सदर मुलाकडे असणारे मोबाईल नंबरचे आधारे तांत्रिक माहितीचा व गोपनीय बातमीदारांचा आधार घेऊन सदर बेपत्ता मुले हीभीमाशंकर तालुका खेड जिल्हा पुणे येथे मोबाईल फोनचे लोकेशन मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन मुलांचा शोध घेत मुले भीमाशंकर येथे मिळून आली सदर मुलांना ताब्यात घेऊन त्यांचे पालक गणेश दामू जाधव व विलास कुंडलिक मोहिते यांना करंजेपूल पोलीस दूरक्षेत्र येथे बोलावून घेऊन मुलांना त्यांचे पालकांच्या ताब्यात दिलेली आहे.मुलांचे नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत
सदरची कामगिरी ही माननीय संदीपसिंह गिल्ल सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण. गणेश बिरादार सो अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग,सुदर्शन राठोड सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग. यांचे मार्गदर्शनाखाली नागनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे. पोलीस हवलदार रमेश नागटिळक. अमोल भोसले, अनिल खेडकर यांचे पथकाने केली.



