बारामती : माळेगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता क्रीडा संकुल माळेगाव बु. येथे होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी आहेत.
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान स्ट्रॉंग रुम व मतमोजणी केंद्र परिसरात सुरक्षा व वाहतुक व्यवस्था सक्षम ठेवण्यासोबतच नागरिकांची संभाव्य गर्दी विचारात घेता २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजे दरम्यान माळेगांव बु. गोफणेवस्ती कडे जाणारी संपूर्ण वाहतूक माळेगाव पोलीस ठाणे समोरील गोफणेवस्ती फाटा ते जोशीवाडा कॉर्नर या दरम्यानचे ५०० मीटर अंतरावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
ही वाहतुक गोफणेवस्ती प्राथमिक आरोग्य केंद्र न्यु इंग्लिश स्कुल साठेनगर राजहंस चौक या पर्यायी मार्गे वळविण्यात येत आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.



